7 Oct 2024, 20:21 वाजता
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक
State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. उद्या दुपारी साडेचार वाजता ही बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा धडाका सध्या महायुती सरकारकडून सुरु आहे. त्यामुळे उद्या होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय सरकार जाहीर करणार याकडे लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Oct 2024, 18:02 वाजता
12 आमदारांबाबत याचिकेवरील सुनावणी संपली, हायकोर्टानं निकाल राखून ठेवला
Hearing on petition of 12 MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी संपली असून, मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी 23 ऑक्टोबरला हायकोर्ट निकाल देणार आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय. दरम्यान निर्णय लागत नाही तोपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत असं मागच्या सुनावणीत कोर्टानं स्पष्ट केलं होतं. तर आज झालेल्या सुनावणीतही कोर्टानं त्याचा पुनरुच्चार केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Oct 2024, 17:30 वाजता
शिक्षकांच्या मागणीसाठी सत्यजीत तांबेंच्या नेतृत्वात उपोषण
Satyajeet Tambe Andolan : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आजी माजी आमदार आक्रमक.. आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात मंत्रालयातील गांधी पुतळ्याजवळ उपोषण.. सत्याजीत तांबेंसोबत किशोर दराडे, किरण सरनाईक यांची उपस्थिती.. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीनियुक्त व नंतर झालेल्या 26 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.. अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना प्रचलित प्रमाणे पुढील टप्पा अनुदान देणे आणि त्रुटीमुळे समान टप्पा देण्याची मागणी.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Oct 2024, 16:59 वाजता
मुंबईत मविआच्या बैठकीला सुरुवात, जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चा
Mumbai MVA Meeting : मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात.. जागावाटपासंदर्भात मविआ नेत्यांची बैठक.. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील जागांबाबत अंतिम चर्चा.. -- मविआ नेत्यांसोबत भाजप आमदार लक्ष्मण पवारही ट्रायडंटमध्ये.. बैठकीसाठी नाना पटोले, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे,अनिल देशमुख उपस्थित.
7 Oct 2024, 14:37 वाजता
'गणपतीचं विसर्जन केल्यानंतर उंदीर मामा राहिला', उत्तम जानकरांची दत्तात्रय भरणेंवर टीका
Uttam Jankar on Dutta Bharne : बारामतीत शरद पवारांनी दीड दिवसांचा गणपती बसवला होता. आता गणपती विसर्जन केलं. मात्र उंदीर मामा राहिला, अशी टीका उत्तम जानकरांनी दत्ता भरणेंवर नाव न घेता केलीय. इंदापूरच्या सभेत जानकरांनी भरणेंना टोला लगावला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2024, 13:42 वाजता
'सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग',हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट
Harshvardhan Patil on Supriya Sule : 'लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग... इंदापूरच्या सभेत हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट..3 वेळा खासदार झाल्या तेव्हाही सहभाग होता-पाटील...शरद पवार पक्ष प्रवेशावेळी हर्षवर्धन पाटलांचं विधान...पवार देतील ती जबाबदारी पार पाडणार-हर्षवर्धन पाटील
7 Oct 2024, 13:26 वाजता
नागपुरात मनोरुग्णाकडून 2 जणांची हत्या
Nagpur Murder : नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर एका मनोरूग्णाने तिथल्या लोकांवर हल्ला केला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन गंभीर जखमी आहेत. मनोरुग्ण व्यक्ती लोकांच्या डोक्यावर वार करू लागला. रेल्वेच्या रुळाच्या लाकडी राफटरनं त्यानं हल्ला केला. यात तामिळनाडूच्या गणेश कुमार डी यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही... पळून जाणाऱ्या आरोपीला कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून आरोपीला पकडले...जयराम रामअवतार केवट आरोपीचे नाव
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2024, 12:38 वाजता
टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Ratan Tata : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांना ब्रीच कँडी रूग्णालयात केले दाखल...रतन टाटा यांच्यावर करण्यात येत आहेत उपचार...अस्वस्थ असल्याने रुग्णालयात दाखल...कमी रक्तदाबाचा त्रास असल्यानं रुग्णालयात दाखल
7 Oct 2024, 12:14 वाजता
हर्षवर्धन पाटील यांच्या हाती 'तुतारी'
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतलीय.. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय.. भव्यदिव्य सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी पक्षात प्रवेश केलाय.. यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते..
7 Oct 2024, 11:35 वाजता
'उद्धव ठाकरेंनी कोकणातील नेतृत्व संपवलं',रामदास कदमांची टीका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : शिवसेनेसाठी अनेक मराठी लोकांनी आपलं रक्त सांडलं. अनेक शिवसैनिकांच्या पत्नींचे कुंकू पुसले गेल्यात. मात्र त्याची माहिती उद्धव ठाकरेंना नसल्याची टीका रामदास कदमांनी पुन्हा केलीय.. कोकणी माणसांनी शिवसेना वाढवली आणि मोठी केलीय..मात्र त्याच कोकणातील नेतृत्व संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप रामदास कदमांनी केकलाय.. ते रत्नागिरीतील कार्यक्रमात बोलत होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा-