State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक

7 Oct 2024, 11:02 वाजता

दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर !, गाईच्या दुधाला प्रती लीटर 5 रुपये अनुदान

 

Cow Milk Producer : धाराशिवमध्ये गाईच्या दुधाला शासनाने प्रती लीटर 5 रूपये अनुदान योजना लागू केलीय... जिल्ह्यातील एकूण 43 दुध प्रकल्पाचा यामध्ये सामावेश आहे.... या प्रकल्पाच्या अंतर्गत येणा-या दुध संकलन केंद्र आणि दुध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी सभासद यांच्या खात्यावर आता प्रती लीटर 5 रुयये अनुदान जमा करण्यात येणारेय... लवकरच अनुदानाचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Oct 2024, 10:37 वाजता

पुण्यातील सामूहिक अत्याचार प्रकरण, आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

 

Pune Crime : पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणा-याला दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. आरोपीची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून हे बक्षीस देण्यात येणारेय. आरोपींचा शोध घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येतेय. पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असून 200हून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात येणारेय. तसंच सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येतंय. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. मात्र आरोपींपर्यंत पोलीस अजूनही पोहोचू शकलेलं नाही

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Oct 2024, 10:08 वाजता

'8 दिवसात मविआचं जागावाटप होईल',जयंत पाटलांची माहिती

 

Jayant Patil On MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होईल,अशी माहिती जयंत पाटील यांनी दिलीय......सरकारमध्ये बसलेले लोक, ज्या पद्धतीने भेट वस्तू वाटतायत...ते पाहता दिवाळी सुखाची होणार असल्याचा. मिश्कील टोलाही त्यांनी लगावलाय...सांगलीच्या शिराळ्यातील शिवस्वराज्य यात्रेत पाटील बोलत होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Oct 2024, 09:41 वाजता

'राष्ट्रवादीमधील सर्वोच्चपद जयंत पाटलांना मिळणार', अमोल कोल्हेंचं मोठं विधान

 

Amol Kolhe On Jayant Patil : खासदार अमोल कोल्हेंनी मोठं विधान केलंय....शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील सर्वोच्चपद जयंत पाटील यांना मिळणार असल्याचं मोठं विधान अमोल कोल्हेंनी केलंय.. सांगलीतील सर्व उमेदवार निवडून आणा असं आवाहनही त्यांनी केलंय.. सांगलीतील शिराळ्यात शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे बोलत होते..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Oct 2024, 09:05 वाजता

मुंबईतील भुयारी मेट्रो आजपासून धावणार

 

Mumbai Metro-3 opens today : मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतल पहिली भुयारी मेट्रो धावणारेय. कुलाबा-वांद्रे - सीप्झ भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेतील आरे - BKC टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. आजपासून हा टप्पा प्रवाशांसाठी सुरु होतोय. 1 दिवसासाठी आरे - BKC मेट्रो टप्पा सकाळी 11 ते रात्री साडे अकरा दरम्यान सुरू राहणारेय. तर मंगळवारपासून सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा या वेळेत आरे - BKC भुयारी मेट्रो सेवा उपलब्ध असणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Oct 2024, 08:30 वाजता

राज ठाकरेंचा आज पुणे दौरा

 

Raj Thackeray : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौ-यावर आहेत...राज ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यात बैठकांची मालिका असणारेय...मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक सकाळी १० पासून सुरू होणारेय....पश्चिम विभागात असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील मुख्य नेते, पदाधिकारी, उपस्थित राहणारेत...आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक असणारेय....दरम्यान दिल्लीत होणा-या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते आज होणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Oct 2024, 08:07 वाजता

अजित पवार शिरुरमधून विधानसभा लढणार?

 

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा शिरूर मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रानं दिलीय. काही दिवासांपूर्वी अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. जो उमेदवार देईन त्याला निवडणून द्या, असं आवाहनही त्यांनी एका सभेतून केलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? अशी चर्चा सुरू होती. अखेर अजित पवारांनी शिरूर मतदारसंघाची निवड केल्याची माहिती सूत्रानं दिलीय. 

7 Oct 2024, 07:36 वाजता

मुख्यमंत्री शिंदेंचा आज दिल्ली दौरा 

 

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दिल्ली दौरा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.. अमित शाहांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक होणार आहे.. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.... तर देशातील 8 राज्यातील नक्षलग्रस्त भागाच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शाहा चर्चा करणार आहे.. . 8 राज्य नक्षलग्रस्त भागाचा अहवाल अमित शाहांना देणार आहे

7 Oct 2024, 07:32 वाजता

हर्षवर्धन पाटील आज तुतारी फुंकणार

 

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील आज शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. इंदारपुरात आज सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोहळा पार पडणारेय. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटीलही उपस्थित राहणार आहेत. हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यासाठी ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल होत आहेत. आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते. उमेदवारी जाहीर झाली तर इंदापुरातून दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत रंगण्याची शक्यताये. सध्या इंदापूरमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-