Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

10 Oct 2024, 21:16 वाजता

टेनिसपटू राफेल नादालची निवृत्तीची घोषणा

 

Rafael Nadal : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालनं निवृत्तीची घोषणा केलीये...हा हंगाम शेवटचा असणार असल्याचं त्यानं जाहीर केलंय...22 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालनं टेनिसमधून निवृत्ती जाहीर केल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पहायला मिळतेय...त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिलीये...

बातमी पाहा - Rafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?

10 Oct 2024, 20:22 वाजता

मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण

 

Manoj Jarange : बीडच्या नारायण गडावरील मराठा समाजाच्या मेळाव्याची तयारी पूर्ण झालीये....मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे..जरांगे ज्या ठिकाणाहून संबोधित करणारेत त्या ठिकाणी मोठं स्टेज उभारण्यात आलंय.. त्याचबरोबर पार्किंग आणि मेळावा होणाऱ्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात आलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

10 Oct 2024, 19:17 वाजता

दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट?

 

Rain Alert : येत्या शनिवारी मुंबईसह राज्यात विविध राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा होत आहे. मात्र मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असणार आहे. शनिवारी दस-याला मुंबईत उद्धव ठाकरेंचा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपर्वीचा हा दसरा मेळावा असल्यानं, या दोन्ही मेळाव्यांकडे राजकीय जाणकार, तसंच सामान्यांचंही लक्ष असणार आहे. मात्र हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढल्या 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचं भाकीत हवामान विभागानं व्यक्त केलं आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

बातमी पाहा - नागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट

10 Oct 2024, 18:16 वाजता

नाशिकमध्ये अबू सालेमच्या मैत्रिणीला अटक

 

Nashik Abu Salem Friend Arrest : नाशिकमध्ये परदेशी नागरिकासह अबू सालेमच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली. परदेशी नागरिक अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर अबू सालेमच्या मैत्रिणीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. अबू सालेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. तिथे अबू सालेमचा घातपात करण्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. नाशिक क्राईम ब्रँच आणि दहशतवादी विरोधी पथकानं एकत्र ही कारवाई केली असून, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. 

10 Oct 2024, 18:14 वाजता

उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन

 

Ratan Tata : ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण, टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं आहे. मुंबईत वरळीमधील स्मशामभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्याआधी स्मशानभूमीतील कम्युनिटी हॉलमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तर रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसंच नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मान्यवरांनी रतन टाटांचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर नागरिकांना स्मशानभूमीत सोडण्यात आलं. यावेळी या महान उद्योजक आणि तितक्याच आदरणीय माणसाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आणि शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. 

10 Oct 2024, 16:26 वाजता

रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा - राज ठाकरे

 

Raj Thackeray : रतन टाटांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात यावा...अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीये...यासंदर्भात राज ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय...रतन टाटांना खरतंर हयात असतानाच भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करायला हवं होतं...आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवा अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केलीये...त्याचबरोबर माझ्यासह तमाम भारतीयांचीही याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही असंही राज ठाकरे पत्रात म्हणालेत...

10 Oct 2024, 14:02 वाजता

उद्योग रत्न पुरस्कार यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल -  मंत्री उदय सामंत 

गुरुवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत एकूण 80 निर्णय घेण्यात आले असून हे सर्व निर्णय समाजपयोगी असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हंटले आहे.  टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की कॅबिनेट बैठकीत टाटा यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे त्याला रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. रतन टाटा यांना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला होता. तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल. नवीन उद्योग भवन हे ७०० कोटींचे होत आहे याला टाटा यांचे नाव देऊन ही एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली असेल. 

10 Oct 2024, 13:33 वाजता

धनगर आरक्षणाचं शुद्धीपत्रक रद्द करण्याची सरकारवर नामुष्की

 

Dhangar Reservation : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की...धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं शुद्धीपत्रक काढण्यात आले होते....धनगड हे आपल्या राज्यातच नाहीत, अशी भूमिका धनगर समाजाची आहे. त्यामुळं धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता....धनगड जातीचे सात दाखले संभाजीनगरात काढले होते. ते जात पडताळणी समितीने रद्द केलेत...महसूल व सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक काढले होते....चुकीचे शुद्धीपत्रक काढणा-यांवर अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी धनगर समाजानं केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

10 Oct 2024, 13:16 वाजता

पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार 

 

Dhananjay Munde : पंकजा मुंडेंच्या भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. खुद्द धनंजय मुंडेंनी ट्विटवरून ही माहिती दिलीय. मी येतोय तुम्हीही या असं आवाहन मुंडेंनी बीडकरांना केलंय.. भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार आहे.. 

10 Oct 2024, 12:34 वाजता

रतन टाटांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर, राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत निर्णय

 

State Cabinet Meeting on Ratan Tata Passed Away : रतन टाटांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर....केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्ताव मंजूर...राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत निर्णय...मंत्रिमंडळ बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली