दिल्लीतल्या माणसाच्या पोटात जिवंत कॉकरोच; डॉक्टरही हैराण, आत गेलाच कसा?

अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या पोटात जिवंत झुरळ सापडलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 11, 2024, 01:20 PM IST
दिल्लीतल्या माणसाच्या पोटात जिवंत कॉकरोच; डॉक्टरही हैराण, आत गेलाच कसा?

23 वर्षीय व्यक्ती पोटात दुखणे आणि पचनक्रिया बिघडण्याची समस्या घेऊन रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातीला अतिशय सामान्य वाटणारी ही घटना सगळ्यांनाच चक्रावून टाकणारी आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तर झालं असं ही व्यक्ती पोटाच्या समस्यामुळे रुग्णालयात दाखल झाला. दोन तीन दिवसांपासून पोटात दुखत होते तसेच जेवण पचन नसल्याची तक्रार त्याने डॉक्टरांकडे केली. तेव्हा डॉक्टरांनी त्याला एंडोस्कोपी करण्याचा सल्ला दिला. या तपासणी दरम्यान रुग्णाच्या छोट्या आतड्यांमध्ये एक जिवंत झुरळ असल्याचं आढळलं. डॉक्टरांसाठी देखील हा सुरुवातीला धक्का होता. 

डॉक्टरांच्या टीमने एंडोस्कोपी करुन पोटातील झुरळ काढण्याचं ठरवलं. यासाठी दोन चॅनलमधून लेन्स आणि एक एंडोस्कोपचा वापर करण्यात आला. डॉक्टरांनी गांभीर्य समजून घेत तातडीने एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. 

लहान आतड्यात 3 सेमी जिवंत झुरळ आढळून आले. फोर्टिस हॉस्पिटल, वसंत कुंज येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ डॉ. शुभम वात्स्य यांच्या पथकाने १० मिनिटांच्या एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे झुरळ काढले. रूग्णालयात दाखल केले असता, गेल्या दोन-तीन दिवसांपासून या रुग्णाने पोटदुखी आणि अन्न अपचनाची तक्रार केली होती.

पोटातील झुरळ प्राणघातक

यानंतर डॉ वात्स्या आणि त्यांच्या टीमने एंडोस्कोपी करण्याचा सल्ला दिला. या तपासणीदरम्यान रुग्णाच्या लहान आतड्यात जिवंत झुरळ आढळून आले. वैद्यकीय पथकाने एन्डोस्कोपिक पद्धतीने झुरळ काढले. झुरळ काढण्यासाठी दोन वाहिन्यांनी सुसज्ज एन्डोस्कोप वापरण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करताना डॉ. शुभम वात्स्या म्हणाले, “लहान आतड्यात जिवंत झुरळ दिसणे ही जीवघेणी परिस्थिती असू शकते, म्हणून आम्ही ते काढून टाकण्यासाठी ताबडतोब एन्डोस्कोपी केली.

झुरळ पोटात गेला कसा 

डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णाने जेवताना झुरळ खाल्ल असेल. किंवा रुग्णल झोपला असताना झुरळ त्याच्या तोंडावाटे पोटात गेल्याची शक्यता देखील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. झुरळ वेळेतच काढलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम रुग्णाला भोगावे लागले असते. त्यामुळे एंडोस्कोपी करताच डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेतल्याचं डॉक्टर सांगतात. 

छोट्या आतडीला चिकटला होता झुरळ 

तपासादरम्यान रुग्णाच्या लहान आतड्यात एक जिवंत झुरळ अडकल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी एंडोस्कोपी करून हे जिवंत झुरळ यशस्वीपणे काढले. या प्रक्रियेसाठी एंडोस्कोपीची मदत घेण्यात आली. टीमने एन्डोस्कोपद्वारे झुरळ सक्शन चॅनलमध्ये खेचून शरीराबाहेर काढून रुग्णाचा जीव वाचवला.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More