Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

10 Oct 2024, 12:15 वाजता

'सध्याचे खासदार मारहाणीची भाषा करतात', सुजय विखेंचा निलेश लंकेंवर आरोप

 

Sujay Vikhe on Nilesh Lanke : टायगर अभी जिंदा है असं म्हणत सुजय विखे यांनी निलेश लंकेना इशारा दिलाय.. पराभूत झालो असलो तरी खचलो नाही असंही सुजय विखे म्हणालेत.सध्या निवडून आलेले खासदार विकासाबाबत बोलत नाहीत.. मारहाण आणि शिविगाळीची भाषाच ते कायम करत असतात असंही सुजय विखे म्हणालेत.. नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी लंकेंवर टीका केलीय.. 

10 Oct 2024, 11:31 वाजता

आज एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख- राज ठाकरे

 

Raj Thackeray on Ratan Tata Passed Away : आज एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

10 Oct 2024, 11:02 वाजता

भारताच्या विकास यात्रेत टाटांचं योगदान विस्मरणीय- मोहन भागवत

 

Mohan Bhagwat on Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं परिपत्रक काढून शोक व्यक्त केलाय. संपूर्ण देशासाठी ही दु:खद घटना आहे, अशी भावना सरसंघचालक मोहन भागवतांनी पत्रकातून व्यक्त केलीय. भारताच्या विकासयात्रेत टाटांचं योगदान विस्मरणीय आहे. भारताचा अमूल्य रत्न हरपला असंही मोहन भागवतांनी परिपत्रकात म्हटलंय.

10 Oct 2024, 10:35 वाजता

शेवटची राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

 

State Cabinet Meeting : आज राज्य सरकारची सह्याद्री अतिथी गृहात मंत्रिंडळाची बैठक होणार आहे...विधानसभा निवडणुकी पूर्वीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता....उद्योजक रतन टाटा यांना मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर बैठकीला होईल सुरुवात....विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज देखील घोषणांचा पाऊस पडेल असा अंदाज...शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा होण्याची शक्यता...
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

10 Oct 2024, 10:10 वाजता

टाटांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयांचे नुकसान- मुकेश अंबानी

 

Mukesh Ambani on Ratan Tata Passed Away  : टाटांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयांचे नुकसान झाले...भारताचा एक दयाळू -हदयाचा मुलगा हरपला... मुकेश अंबानी यांनी भावना व्यक्त केल्या...

10 Oct 2024, 10:05 वाजता

उद्योजक, प्रखर राष्ट्रवादी हरपल्याने खूप दु:ख झाले- अमित शाह

 

Amit Shah : उद्योजक, प्रखर राष्ट्रवादी हरपल्याने खूप दु:ख झाले... देशाच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे...केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

10 Oct 2024, 09:11 वाजता

तुम्हाला कधीही विसरले जाणार नाही- आनंद महिंद्रा

 

Anand Mahindra  on Ratan Tata Passed Away : तुम्हाला कधीही विसरले जाणार नाही, कारण, महापुरूष कधीचं मरत नाहीत, अशा शब्दांत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

10 Oct 2024, 08:14 वाजता

रतन टाटा एक दूरदृष्टी असणारे उद्योजक होते- पंतप्रधान

 

PM Modi on Ratan Tata Passed Away : रतन टाटा एक दूरदृष्टी असणारे उद्योजक होते...दयाळू आणि असाधारण व्यक्तिमत्व... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केलाय.

10 Oct 2024, 07:39 वाजता

रतन टाटांच्या निधनानंतर आज शासकीय दुखवटा जाहीर

 

Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनानंतर आज शासकीय दुखवटा जाहीर...सरकारचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

10 Oct 2024, 07:34 वाजता

उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

 

Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टाटा यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. तिस-या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानं त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं... मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली...

बातमीचा व्हिडीओ पाहा-