Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 11, 2024, 17:15 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

11 Oct 2024, 17:13 वाजता

अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार?

 

Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय..अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना जागा सोडायला तयार असल्याची माहिती समोर येतेय...मनसे नेते अमित ठाकरे भांडूप विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असतील तर, शिवसेना शिंदे पक्ष ही जागा सोडायला तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...

11 Oct 2024, 16:23 वाजता

ज्ञानराधा सोसायटीला ईडीचा दणका

 

Dnyanradha Society : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह झालेल्या सोसायटीमध्ये आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी सोसायटीची 1 हजार कोटी 79 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना इथल्या काही इमारती आणि भूखंडांचा समावेश आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ईडीने सोसायटीची 85 कोटी 88 लाख रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली होती.  आतापर्यंत सोसायटीची एकूण 1  हजार 97 कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केलीय. जवळपास चार लाख गुंतवणूकदारांना ज्ञानराधा सोसायटीने गंडा घातल्याचं निदर्शनास आलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2024, 16:19 वाजता

अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार?

 

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. मी माझ्या घरट्यात जाऊन थांबतो, असं म्हणत अजित पवारांनी संकेत दिलेत...निवडून द्या आणि बाकीचं माझ्यावर सोपवा, असं म्हणत अजित पवारांनी नाशिकमधल्य़ा भाषणात संकेत दिलेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Oct 2024, 16:11 वाजता

नव्या शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर

 

Ashwini Vaishnav & Chandrakant Patil : नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केल्याचं समोर आलंय नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात महाराष्ट्र अग्रेसर असल्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला 300 कोटी देणारेय. आज केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.  दोघांनीही या करारावर स्वाक्ष-या केल्या. 

11 Oct 2024, 14:02 वाजता

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

 

Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा...टाटा ट्रस्टच्या मुंबईतील बैठकीत निर्णय...रतन टाटांच्या निधनानंतर नोएल टाटांची नियुक्ती...-नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ

11 Oct 2024, 13:21 वाजता

पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

 

Pune Vehical Todfod : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड...तीन मुलांनी दारुच्या नशेत 12 वाहनं फोडली...गाड्या फोडणा-या दोघांना अटक, एक फरार...पुण्यातील जनता वसाहत परिसरातील घटना

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Oct 2024, 12:21 वाजता

शासन निर्णयांचा धडाका,​ 10 दिवसात 1 हजार 291 शासन निर्णय जारी

 

Government Decision : 10 दिवसात 1 हजार 291 शासन निर्णय जारी...आचारसंहिता लागेपर्यंत शासन निर्णयांचा धडाका...प्रलंबित निर्णय जाहीर करण्याची सरकारची धावपळ...वर्क ऑर्डर काढण्यासाठी सर्वच विभागांची लगबग

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Oct 2024, 11:59 वाजता

अजित पवारांची तातडीची पत्रकार परिषद

 

Ajit Pawar : आज अजित पवारांची महत्त्वाची पत्रकार परिषद...संध्याकाळी 6.30 मिनिटांनी अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे..आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती...अजित पवार काय घोषणा करणार या कडे महाराष्ट्राचं लक्ष...मत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद बोलावल्यानं पक्षकार परिषदेचं महत्त्व वाढलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Oct 2024, 11:34 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या साधणार जनतेशी संवाद साधणार

 

Raj Thackeray :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणारेत. पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणारेत. पहिल्यांदाच राज ठाकरे दसऱ्याच्या दिवशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष असणारेय 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Oct 2024, 11:11 वाजता

छगन भुजबळांचे निवृत्तीचे संकेत

 

Chhagan Bhujbal Retirement : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं छगन भुजबळ यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय.. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत.. कोणताही निर्णय घेताना मला विचारण्याची गरज नसल्याचंही त्यांनी मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळांना सांगितलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-