Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

11 Oct 2024, 08:36 वाजता

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद- सूत्र

 

Mahayuti : मंत्रिमंडळ बैठकीत वादाची ठिणगी-सूत्र...शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद-सूत्र...अजित पवार बैठकीतून उठून गेलेत- सूत्र...मुख्यमंत्री शिंदेंच्या काही महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी न दिल्यानं शिंदे आणि अजित पवारांमध्ये बैठकीत खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती...
 

11 Oct 2024, 08:07 वाजता

 पुण्यात  7 नव्या पोलीस स्टेशनचं आज उद्घाटन

 

Pune New Police Station  : पुण्यात आज नवीन सात पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात येणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटन समारंभाला उपस्थित असणारेत.
नवीन पोलीस स्टेशनसाठी 816 मनुष्यबळ देखील मंजूर झालंय. तसंच पायाभूत सोई- सुविधांसाठी 59 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. दरम्यान, नवीन सात पोलीस स्टेशनमुळे पुणे शहरात आता एकूण 39 पोलीस स्टेशन्स झालीत. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी नवीन पोलीस ठाण्याची नावं आहेत.

11 Oct 2024, 07:39 वाजता

नवी मुंबई विमानतळावर आज उड्डाण चाचणी

 

Navi Mumbai Airport : नवी मुंबईत विमानाचं लवकरच टेक ऑफ होण्याची शक्यताय कारण... नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी होणारेय... नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर आज हवाई दलाचं सुखोई 30 विमान धावपट्टीवरून काही अंतरावर उड्डाण करणार आहे. तर लष्कराचं विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरणारेय. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल हे मान्यवर उपस्थित राहणारेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Oct 2024, 07:33 वाजता

मुंबईतील दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट

 

Mumbai Rain Alert : येत्या शनिवारी मुंबईसह राज्यात विविध राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंचा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा दसरा मेळावा असल्यानं, या दोन्ही मेळाव्यांकडे राजकीय जाणकार, तसंच सामान्यांचंही लक्ष लागलं आहे. मात्र हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढल्या 2 ते 4 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-