Baba Siddiqui Murder Case : लॉरेन्स गँगनं घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी- सूत्र

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Baba Siddiqui Murder Case : लॉरेन्स गँगनं घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी- सूत्र

13 Oct 2024, 10:41 वाजता

खंत वाटत असेल तर फडणवीसांनी राजीनामा द्या-  संजय राऊत

 

Sanjay Raut on Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेत. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. थोडीतरी खंत वाटत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. अन्यथा राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलीय. तर देवेंद्र फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.

13 Oct 2024, 10:09 वाजता

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा गुन्हा दाखल

 

Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखा बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

13 Oct 2024, 09:39 वाजता

50 हजारांसाठी बाबा सिद्दीकींची हत्या- सूत्र

 

Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आलीय. 4 जणांनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची माहिती सूत्रानं दिलीय. प्रत्येक आरोपी 50 हजार रुपये वाटून घेणार होता. ..बाबा सिद्दिकी यांची हत्या केलेल्या आरोपींनी 2 सप्टेंबर पासून कुर्ल्यात भाड्यावरती रूम घेतलेली होती... सूत्राची माहिती...चार जण मिळून ही या रूममध्ये राहत होते व याचा 14 हजार रुपये भाड देत होते - सूत्र....पंजाब येथे जेलमध्ये असताना हे तिघेही आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले होते....त्यातील आधीच एक जेलमध्ये असणारा आरोपी बिष्णोई यांची संबंधित होता तेव्हा त्यांची ओळख झाली...त्यानंतर हा संपूर्णपणे कट हा गेल्या काही महिन्यांमध्ये रचला गेलेला आहे

13 Oct 2024, 09:03 वाजता

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांचे 4 पथकं मुंबई बाहेर तपास करणार 

 

Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत....पोलिसांची ही चार पथकं मुबंई बाहेर चौकशी करणार आहेत....हत्या प्रकरणातले 2 आरोपी उत्तर प्रदेशातले तर एक आरोपी हरयाणातला आहे....एका आरोपीचं नाव धर्मराज कश्यप तर दुसऱ्याचं नाव कर्नल सिंह असल्याची माहिती मिळतेय

13 Oct 2024, 08:33 वाजता

बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या आधी आरोपींना अ‍ॅडव्हान्स पेमेंट?

 

Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींची पोलिसांनी रात्री सात तास चौकशी केली. आरोपींना हल्ल्याच्या आधी ऍडव्हान्स पेमेंट केलं होतं, अशी माहितीही मिळतेय.बाबा सिद्धीकी यांचं कार्यालय, घर आणि ते राहतात त्या परिसराची आरोपींनी रेकी केली होती. हल्ल्याच्या आदल्या रात्री आरोपींना बंदूक मिळाल्याची कबुली आरोपींनी दिली.. 

13 Oct 2024, 08:08 वाजता

सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नाहीत-  विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar on Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधलाय. जर सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नसतील तर महाराष्ट्र सुरक्षित आहे का?, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारला केलाय. सत्ताधा-यांना बुलेटप्रुफ जॅकेट घातला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढलाय. 

13 Oct 2024, 07:30 वाजता

बाबा सिद्धीकींच्या पार्थिवावर कूपर रुग्णालयात पोस्टमार्टेम होणार 

Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्धीकींच्या पार्थिवावर कूपर रुग्णालयात पोस्टमार्टेम होणार आहे.. लिलावती रुग्णालयातून त्यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आलंय.. सकाळी 8 वाजता पोस्टमॉर्टेम सुरू होणार आहे.... पोस्टमॉर्टेमचं व्हिडिओ चित्रिकऱण होणार आहे.. दोन तास या सगळ्या प्रक्रियेला लागू शकतात त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरी नेण्यात येईल

13 Oct 2024, 07:26 वाजता

बाबा सिद्दीकींची हत्या संपत्तीच्या वादातून- सूत्र

 

Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. बाबा सिद्दीकींना Y सुरक्षा होती. तरीही त्यांच्यावर हल्ला झाला. मात्र, हा हल्ला कुणाच्या इशा-यावर झाला? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. हत्येच्या संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोईवर असली तरी आता या प्रकरणात दुसरी बाजू समोर येतेय. बाबा सिद्दीकींची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची माहिती सूत्रानं दिलीय. बाबा सिद्दीकींची SRA प्रोजेक्ट प्रकरणी चौकशी सुरू होती आणि प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचं म्हणण आहे. मात्र, तपास यंत्रणेच्या हाती अजून काहीही लागलेलं नाही.