Baba Siddiqui Murder Case : लॉरेन्स गँगनं घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी- सूत्र

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Baba Siddiqui Murder Case : लॉरेन्स गँगनं घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी- सूत्र

13 Oct 2024, 23:45 वाजता

बाबा सिद्दीकी यांच्यावर बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी... शासकीय इतमामात अखेरचा निरोप

 

Baba Siddique Dafan : बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. तिथे जनाजाची नमज वाचण्यात आली. त्यानंतर मानवंदना दिल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर दफनविधी झाले. त्याआधी त्यांची अंत्ययात्रा रात्री 8 वाजता वांद्रेमधील त्यांच्या घरातून निघाली. जनाजा नमाजचं पठण केल्यानंतर सिद्दीकींची अंत्ययात्रा सुरु झाली. यावेळी पाऊस पडत असतानाही सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले. दरम्यान दिवसभरामध्ये सिद्दीकींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसंच्या त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी विविध राजकीय नेते तसंच बॉलिवुडमधील कलाकार त्यांच्या घरी येऊन गेले. 

 

13 Oct 2024, 19:24 वाजता

Pandharpur : कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे बैठक संपन्न झाली. कार्तिक यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येतात.. त्यामुळे या भाविकांना दर्शन सुविधा सुरू करण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला.. तसंच 4 नोव्हेंबर पासून 12 नोव्हेंबरच्या कार्तिक यात्रेपूर्वी 24 तास दर्शन सुरू राहणारे.. अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Oct 2024, 18:42 वाजता

सलमान खानच्या घराबाहेर पोलीस सुरक्षतेत वाढ

 

Salman Khan Home Security : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Oct 2024, 17:54 वाजता

राज्यात मविआचं सरकार येणार - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray On Mahayuti : आमच्या सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.. सध्याच्या सरकारमध्ये केवळ जाहिरातबाजी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.. विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला घरी बसवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Oct 2024, 16:36 वाजता

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर मविआत एकमत

 

MVA On Chief Minister : महाविकास आघाडीमध्ये अखेर सीएम पदाच्या चेह-यावर एकमत झालाय. मुंबईतील आजच्या संयुक्त बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी सीएम पदाच्या चेह-यावर प्रतिक्रिया दिलीय. महायुतीनं अगोदर चेहरा जाहीर करावा, त्यानंतर आम्ही जाहीर करू, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. यावर उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंचं मत मान्य असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Oct 2024, 14:11 वाजता

'आता योग्य निर्णय घेण्याची गरज', राज ठाकरेंचं आवाहन

 

Raj Thackeray : 'निवडणुका कधीही जाहीर होतील'...'आता योग्य निर्णय घेण्याची गरज'...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आवाहन...'रतन टाटांप्रमाणे सभ्य प्रामाणिक राजकारणी का आवडत नाही'...'गद्दारी करणारा नेता का आवडतो?'...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल

13 Oct 2024, 13:24 वाजता

विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

 

Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय.. येत्या निवडणुकीत ना युत्या ना आघाड्या मनसेचा स्वबळाचा नारा अशी घोषणाच राज ठाकरेंनी केलीये.. 

13 Oct 2024, 12:27 वाजता

लॉरेन्स गँगनं घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी- सूत्र

 

Baba Siddiqui Murder Case :  बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा...लॉरेन्स गँगनं घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी...जबाबदारी घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल...

13 Oct 2024, 11:49 वाजता

बाबा सिद्धीकींच्या हत्येचा सूत्रधार कोण हे समोर यावं- विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar on Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्धीकींच्या हत्येचा सूत्रधार कोण हे समोर यावं अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. आरोपींना पकडून त्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याची गरज आहे....
 

13 Oct 2024, 11:20 वाजता

केवळ सुरक्षा देऊन काही होत नाही- छगन भुजबळ

 

Chhagan Bhujbal on Baba Siddiqui Murder Case : केवळ सुरक्षा देऊन काही होत नाही....ही कॉन्ट्रॅक्ट किलिंगची घटना10-20 हजारात ही मुलं हत्या करतात...पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा..छगन भुजबळ यांचं वक्तव्य