17 Oct 2024, 15:40 वाजता
IPS अधिकारी भाग्यश्री नवटाकेंवर गुन्हा दाखल
IPS officer Bhagyashree Navtake : सीबीआयने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल केला...त्या पुण्यात DCP, EOW पदावर कार्यरत होत्या....जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) राज्य सहकारी पतसंस्थेच्या 1,200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...2020-21 दरम्यान हा घोटाळा झाला होता...महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची शिफारस केली...सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Oct 2024, 15:26 वाजता
आम्ही आमच्या आमदारकी गुवाहटी जाऊन पणाला लावल्या- शहाजी बापू
Shahaji Bapu Patil on BJP : आम्ही धाडसं केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्वं होतं? अशा शब्दांत सांगोला शिवसेनेचे आमदार शहाजी बापू यांनी भाजपला सुनावलंय...आम्ही आमची आमदारकी पणाला लावल्याचंही ते यावेळी म्हणालेत...
17 Oct 2024, 14:52 वाजता
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी
Ravindra Chavan : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर....काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी जाहीर....नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर
17 Oct 2024, 13:06 वाजता
नागपुरात राहुल गांधींविरोधात बॅनरबाजी
Nagpur Rahul Gandhi : नागपुरात राहुल गांधींवर टीका करणारे होर्डिंग लावण्यात आले आहे... अमेरिकेत राहुल गांधींनी केलेल्या आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून हे होर्डिंग लावले आहेत... राहुल गांधींनी आमचं आरक्षण संपवण्याची भाषा केली, आणि आम्ही तुम्हाला हरियाणामध्ये जागा दाखवली, अश्या आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिण्यात आलाय...महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना, राहुल गांधींच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Oct 2024, 12:55 वाजता
पवारांची घोषणा, ठाकरे सावध
Sanjay Raut : शरद पवारांनी जयंत पाटलांना मोठी जबाबदारी देणार अशी घोषणा वाळव्याच्या सभेत केली. या घोषणेवरुन शिवसेना ठाकरे गट नाराज झालाय. एका पक्षात दोन-दोन मुख्यमंत्री कसे असू शकतात असा सवाल संजय राऊतांनी केलाय. शरद पवारांनी रोहित पवारांवरही मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती त्याचा अर्थ काय असा सवालही त्यांनी केलाय. शरद पवार मुख्यमंत्रिपदाबाबत असे कोणतेही संकेत देत नाही. मग त्यांच्या मोठ्या जबाबदारीबाबतच्या वक्तव्याचा अर्थ काय असावा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Oct 2024, 12:36 वाजता
गोंदियात भाजपचं टेन्शन
Gondiya Rajkumar Badole : माजी मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले यांनी हातावर घड्याळ बांधण्याच्या चर्चा फेटाळून लावल्यात..कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केलाय..पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याचंही बडोले म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Oct 2024, 12:23 वाजता
ब्राह्मण समाज 30 जागांसाठी आग्रही
Pune Brahman Samaj : राज्यातील 288 पैकी 30 जागांवर ब्राह्मण समाजाचा उमेदवारा द्यावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने केलीये. पुण्यातील कसबा मतदारसंघही ब्राह्मण समाजालाच द्यावा आणि त्या जागेवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंना उमेदवारी द्यावी अशी मागणीही ब्राह्मण समाजाने केलीये.
17 Oct 2024, 12:10 वाजता
बिहारमध्ये विषारी दारुमुळे 20 जणांचा बळी
Bihar Liquor Death : बिहारमध्ये विषारी दारुमुळे 20जणांचा बळी गेलाय.. सिवानमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये.. हा अवैध दारूचा ठेका होता..दारू प्यायल्यानंतर मजुरांची प्रकृती बीघडली...अनेकांना रुग्णालयात दाखल केलंय....दरम्यान 20 मजुरांचा दारूने बळी घेतलाय.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी SITस्थापन करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Oct 2024, 11:56 वाजता
समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात-सूत्र
Sameer Wankhede : IRSअधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत... समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे... समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. मात्र राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागेल. त्यानंतरच राजकारणातील त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Oct 2024, 11:54 वाजता
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचे अनेक कारनामे
Pune Bopdev Ghat Case Update : पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तर शेख याचे धक्कादायक कारनामे पोलीस चौकशीत उघडकीस आलेत.. अख्तर शेखनं आतापर्यंत 3 महिलांशी लग्न केल्याची माहिती उघडकीस आलीये.. यातील दोन महिला नागपुरातील तर एक उत्तर प्रदेशातील आहे.. याशीवाय आणखी एका तरुणीशीही त्याचे संबंध होते.. बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार करण्यापूर्वी या आरोपीनं गांजाचं सेवन केल्याची प्राथमिक माहितीही समोर आलीये.. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल होते.. दरम्यान त्याला कोर्टात हजर केलं असता 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.
बातमी पाहा - 3 लग्न, 1 अफेयर; बोपदेव घाट अत्याचारातील मुख्य सुत्रधाराचे प्रताप ऐकून येईल चीड