Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

17 Oct 2024, 11:27 वाजता

इच्छुकांना महामंडळ महायुतीचं डॅमेज कंट्रोल?

 

Mahamandal : विधानसभा निवडणुकीत ज्या इच्छुकांना उमेदवारी देता येणार नाही त्यांची महामडंळांवर वर्णी महायुतीनं लावल्याचं पाहायला मिळतंय. इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा महामंडळ पॅटर्न पाहायला मिळाला. यावेळी महायुतीत इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सगळ्यांनाच उमेदवारी देणं शक्य नसल्यानं ज्यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यांना महामंडळं देण्यात आलीयेत.

17 Oct 2024, 10:37 वाजता

चाकणमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या

 

Pune Suicide : पुण्यातील चाकणमध्ये एका 27 वर्षाच्या तरुणाने प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय... लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन या तरुणाने आत्महत्या केली.  तरुणाचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीत आढळला... तरुणाने  आत्महत्या करण्यापूर्वी 2 सेकंदाचा व्हिडिओ बनवून  घरी पाठवला...  या  व्हिडिओच्या आधारे  लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने मृतदेह शोधून काढला....  तरुणाच्या  प्रेयसीचं दुस-या  तरुणाशी प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या संशयामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलंय..

बातमी पाहा - प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, 'त्या' व्हिडिओमुळं उकललं गूढ

17 Oct 2024, 10:19 वाजता

सरकारकडून आचारसंहिता भंग?

 

State Government Decision : आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारनं काही तातडीनं निर्णय घेतले..मात्र सरकारचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं आचारसंहिता लागल्यानंतर काही निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय..त्यामुळे सरकारनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यता आलाय.. सरकारकडून काही निर्णय आधी घेण्यात आले आणि त्यावर पुढील तारीख टाकल्याचा आऱोपही करण्यात आलाय.. यावर आता निवडणूक आयोगानं सरकारचे निर्णय़ तपासू आणि त्यानंतर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे सरकारनं घेतलेले काही निर्णय आचारसंहितेच्या कटाच्यात सापडण्याची शक्यता आहे..  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 09:53 वाजता

BDD चाळ रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

 

Worli BDD Chawl : मुंबईतल्या वरळी इथल्या बीडीडी चाळ रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. बी.डी.डी. चाळ क्रमांक १ ते ७  मधल्या रहिवाश्यांनी महाराष्ट्र शासन आणि म्हाडाच्या घरकुल वितरणावर नाराजी व्यक्त करत  निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.  रहिवाश्यानी ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार असे बॅनर लावलेत इतकंच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाला मतं मागण्यासाठी इमारतीत येऊ नये, असा कडक इशारा दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 09:37 वाजता

संगमनेरमधून सुजय विखेंना उमेदवारी नाही?

 

Sujay Vikhe : अहिल्यानगरच्या संगमनेर मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली होती.. मात्र एकाच घरत दोघांना उमेदवारी नको असं सांगत भाजपनं त्यांना तिकीट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिवसेनेकडे आहे.. त्यामुळे या जागेवर कोणता उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगलीये.. दरम्यान सुजय विखे पाटलांना उमेदवारी नाकारल्यानं बाळासाहेब थोरात आणि सुयज विखेमधील बिग फाईट टळण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 09:30 वाजता

लातूरमध्ये पॅरोलवरील गुन्हेगाराकडून पत्नीची हत्या

 

Latur Murder : लातूरमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने घरी येताच आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केलीये...उदगीर शहरातील अमित नाटकरे हा आरोपी 2 खूनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता..यातील एका खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.... पॅरोलवर सुट्टी घेवून तो उदगीरला आला होता....2 केसमध्ये कोर्टात अपील करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने  पत्नीला माहेरहून पैसे घेवून ये म्हणत तीला मारहाण केली...या वादातून आरोपीने पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 09:11 वाजता

10वी आणि 12वीचं वेळापत्रक अद्याप जाहीर नाही

 

SSC & HSC Exam Time Table : मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाहीए. असं स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने केलंय. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली वेळापत्रकं ग्राह्य धरू नयेत असं आवाहनही करण्यात आलंय. राज्य मंडळाचे बोधचिन्ह, नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 08:56 वाजता

ठाणे, रायगड, रत्नागिरीला यलो अलर्ट

 

IMD Rain Alert : एकीकडे तापमान वाढलेलं असताना दुसरीकडे ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रविवारपर्यंत तसंच पालघर जिल्ह्यात आज आणि शनिवारी, रविवारी यलो अलर्ट देण्यात आलाय... अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर इथे रविवारपर्यंत, सांगली, कोल्हापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, संभाजीनगर इथे शनिवारपर्यंत यलो अलर्ट जाहीर केलाय.. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलाय.. मेघगर्जनेसह विजा तसेच पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 08:21 वाजता

बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी 3 पिस्तुलांचा वापर

 

Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीये. आरोपींनी एक ऑस्ट्रेलियन बनावटीची ग्लॉक पिस्तूलही वापरली होती.. तसंच तुर्की पिस्तुल आणि एक देशी बनावटीची पिस्तुलाचाही वापर केला होता.. पोलिसांनी ही तीनही शस्त्रे जप्त केली आहेत..12 ऑक्टोबर रोजी निर्मल नगर येथील जीशान सिद्दीकी कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 Oct 2024, 07:43 वाजता

पुणे शहरात आज पाणीपुरवठा बंद

 

Pune Water : पुणे शहर आणि उपनगरात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे.. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. शिवाय शुक्रवारीही उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.