Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Oct 2024, 22:21 वाजता

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

 

Shivsena : शिवसेनेची तिसरी यादी जाहीर...तिस-या यादीत १५ उमेदवारांची नावे जाहीर...मुंबादेवीतून शायना एन सी यांना उमेदवारी 

28 Oct 2024, 20:53 वाजता

शिवसेनेनं अर्ज न दिल्यानं श्रीनिवास वनगा संतप्त

 

Shrinivas Vanga : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला नाही..पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप....वनगांना पालघरमधून उमेदवारी डावलल्यानंतर श्रीनिवास वनगा संतप्त असून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत...तर उद्धव ठाकरे देवमाणून असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय...श्रीनिवास वनगांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं ते डीप्रेशनमध्ये असल्याचं त्यांच्या पत्नी सुमन वनगा म्हणाल्या...शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडलेल्या 40 आमदारांमध्ये श्रीनिवास वनगाही होते...39 आमदारांना उमेदवारी देण्यात आली मात्र वनगांना उमेदवारी न मिळाल्यानं ते संतप्त झालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Oct 2024, 19:19 वाजता

समीर भुजबळांविरोधात पंकज भुजबळ प्रचार करणार 

 

Sameer Bhujbal : भुजबळांच्या घरात भाऊंबदकी पहायला मिळतेय...समीर भुजबळांनी बंड करत नांदगावमधून अपक्ष लढण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांची अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केली...त्यानंतर महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदेंना नांदगावमधून उमेदवारी देण्यात आली...तर येवल्यातून छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालीये...दरम्यान आज महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी छगन भुजबळांचे पूत्र आणि आमदार पंकज भुजबळ हजर होते...यावेळी त्यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडून नांदगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश असल्याचं सांगितलं...त्यामुळे आता भुजबळ कुटुंबात भाऊबंदकी पहायला मिळण्याची शक्यता आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Oct 2024, 18:25 वाजता

अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर मंत्री करणार-सूत्र

Amit Thackeray : लोकसभेतील मनसेच्या (MNS) बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यात महायुतीला अडचणी येत असल्याची शक्यता आहे...दादर माहिममधून सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत...त्यामुळे महायुतीच्या बिनशर्त पाठिंब्याच्या परत फेडीत अडचणी येताय...अमित ठाकरेंनी आज दादर माहिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला...तर सदा सरवणकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणारेत...मात्र, अमित ठाकरेंनी विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय....शिवसेनेकडून चाचपणी सुरू असून भाजपला त्यासंदर्भात प्रस्तावही पाठवला जावू शकतो अशी माहिती सूत्रांकडून समजतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

 

28 Oct 2024, 17:08 वाजता

मनसेचा शिवसेनेला 10 जागांचा प्रस्ताव-सूत्र

 

MNS : मनसेनं शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव ठेवला असल्याचं समजतंय. मुंबईतील 10 जागांबाबतचा प्रस्ताव मनसेनं शिवसेनेला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. वरळी, शिवडी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी
भांडुप, विक्रोळी आणि कल्याण, या त्या मुंबईतील जागा आहेत. तर 10व्या जागेबाबत मात्र सस्पेन्स असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 

28 Oct 2024, 16:39 वाजता

राष्ट्रवादी (SP) पक्षाची चौथी यादी जाहीर

 

NCP (SP) : राष्ट्रवादी (SP) पक्षाची चौथी यादी जाहीर..माण - प्रभारक घार्गे, काटोल-सलिल देशमुख, खानापूर-वैभव पाटील, वाई-अरुणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद-शरद मेंद सिंदखेडा- संदीप बेडसेंना उमेदवारी जाहीर 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

28 Oct 2024, 16:06 वाजता

 उद्या माहीममधून सदा सरवणकर उमेदवारी अर्ज भरणार

 

Sada Sarvankar : सदा सरवणकर दादर माहिममधून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत...मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरेंविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Oct 2024, 15:04 वाजता

भाजपची तिसरी यादी जाहीर

 

BJP List : भाजपनं आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 25 जणांची नावं भाजपकडून जाहीर करण्यात आली आहेत. नागपूरच्या सावनेरमधून आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर जोरगेवार यांना तिकीट मिळालंय. तसंच राजू तोडसाम, जितेश अंतापूरकर, भारती लव्हेकर, सुरेश धस, पराग शाह, अर्चना पाटील चाकुरकर, राम सातपुते, संग्राम देशमुख, यांच्यासह एकंदर 25 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपकडून एकंदर 146 जणांची उमदेवारी घोषित करण्यात आली आहे. 

28 Oct 2024, 14:32 वाजता

मविआत जागावाटपाचा गोंधळ कायम

 

Maharashtra Election 2024 : उमेदवारी अर्ज भरायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मविआचे 20 मतदारसंघातील उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. काही जागांवर मित्र पक्षांमध्ये तिढा आहे. काही जागांवर एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यानं उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत. मविआतील जागावाटपाच्या गोंधळामुळे तिन्ही पक्षाचे नेते,कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 

28 Oct 2024, 14:04 वाजता

कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

Maharashtra Election 2024 : कसब्यामध्ये याहीवेळी धंगेकर पॅटर्न चालणार, असा दावा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. धंगेकरांनी कसबा गणपतीची आरती करून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. पोटनिवडणुकीत भाजपाच्या हेमंत रासनेंचा धंगेकरांनी पराभव करत, भाजपाचा बाल्लेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. आता पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने लढत होणार आहे.