IND VS SA t20 Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजनंतर टीम इंडिया साऊथ आफ्रिका विरुद्ध 4 सामान्यांची टी 20 सीरिज खेळण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा दौरा करणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया साऊथ आफ्रिके विरुद्ध पहिली टी 20 सीरिज खेळेल. मात्र या सीरिजसाठी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे साऊथ आफ्रिका (India VS South Africa) दौऱ्यावर जाणार नसून त्या ऐवजी बीसीसीआयने टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी हेड कोच म्हणून भारताच्या माजी खेळाडूची निवड केली आहे. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण हे साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघाचे हेड कोच असतील असं सोमवारी बीसीसीआयच्या एका टॉप ऑफिशियलने क्रिकबझला याबाबत माहिती दिली.
साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि सपोर्टींग स्टाफ 4 नोव्हेंबरच्या जवळपास रवाना होतील. मात्र यावेळी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे भारतीय संघासोबत नसतील. तेव्हा बीसीसीआयने भारताचे माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी हेड कोच म्हणून नेमलं आहे. टीम इंडिया 8 नोव्हेंबर रोजी डरबन येथे साऊथ आफ्रिके विरुद्ध पहिला टी 20 सामना खेळेल. दुसरा सामना ते 10 नोव्हेंबर रोजी गकेबरहा येथे खेळतील. तर सेंचुरियन येथे 10 नोव्हेंबर रोजी तिसरा आणि जोहानिसबर्ग येथे चौथा सामना 15 नोव्हेंबर रोजी पार पडेल.
हेही वाचा : 'तुला काही माहित नाही'; जेव्हा क्रिकेटवरून पत्नी साक्षीने घातला होता MS Dhoni शी वाद
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजनंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील शेवटची टेस्ट सीरिज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण ५ टेस्ट सामने होतील. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर हा न्यूझीलंड सीरिजनंतर थेट भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौरा करेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.