Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Oct 2024, 13:35 वाजता

नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम

 

Nawab Malik : उद्या तुम्हाला कळेल की मी पक्षाकडून लढणार आहे की अपक्ष, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिलीय. नवाब मलिक उद्या मानखुर्दमधून उमेदवारी अर्ज दाखल करणारेत. मात्र ते अपक्ष लढणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. एकीकडे भाजपमधून त्यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसतोय. त्यावर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं मलिकांनी सांगितलंय. तसंच मी अजित पवारांसोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

28 Oct 2024, 13:33 वाजता

बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

Maharashtra Election 2024 : अजित पवारांनी बारामती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज भरण्यापूर्वी अजित पवारांनी बारामतीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनही केलं. अजित पवार उमेदवारी अर्ज भरताना त्यांचे चिरंजीव पार्थ पवारही उपस्थित होते.

28 Oct 2024, 11:48 वाजता

बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

Maharashtra Election 2024 : युगेंद्र पवारांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज भरण्यापूर्वी कुटुंबियांकडून युगेंद्र पवारांचं औक्षणही करण्यात आलं. कण्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन बारामती प्रशासकीय भवनाकडं रवान झाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत युगेंद्र पवारांनी अर्ज दाखल केला. सुशिक्षित आणि जाणकार तरुणाला पक्षान संधी दिलीय अशी प्रतिक्रिया शरद पवारंनी दिली.

28 Oct 2024, 11:18 वाजता

कोपरी पाचपाखाडीत शिंदे विरुद्ध दिघे लढत

 

Maharashtra Election 2024 : राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केदार दिघेंना उमेदवारी दिलीय. केदार दिघेही आजच अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे असा सामना रंगणारेय. अर्ज दाखल करण्याआधी दोन्ही नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणाची वर्णी लागतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2024, 10:48 वाजता

आज अनेक दिग्गज नेते भरणार उमेदवारी अर्ज

 

Maharashtra Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी पाचपाखाडी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर मनसेकडून अमित ठाकरे दादर-माहिमसाठी  उमेदवारी अर्ज दाखल करणार.राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे अर्ज भरणार आहे.. तर विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत...  तर सदा सरवणकरही उमेदवारी अर्ज भरणार आहे...

बातमी पाहा - Maharashtra Breaking News LIVE UPDATES : एकनाथ शिंदे यांच्या बंडातील एकमेव सीटिंग आमदाराचा पत्ता कट ?

28 Oct 2024, 10:41 वाजता

बारामतीतून युगेंद्र पवार भरणार उमेदवारी अर्ज

 

Baramati Yugendra Pawar : युगेंद्र पवार काही वेळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होत आहेत. त्यांच्या निवास्थानी कुटुंबीयांकडून संपूर्ण तयारी केलीय. कुटुंबियांकडून युगेंद्र पवारांचं औक्षणही केलं. औक्षण करून कण्हेरी मारुतीचे दर्शन घेऊन युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामती प्रशासकीय भवन इथं जाणार आहेत. अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थितीत असणार आहेत.

 

28 Oct 2024, 09:42 वाजता

मविआत जागावाटपांचा घोळ कायम?

 

Maharashtra Election : मविआत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवेसना ठाकरे यांना प्रत्येकी ९० जागांचा फॉर्म्युला ठरला होता. असं असताना काँग्रेसनं आतापर्यंत ९९ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे जाहीर फॉर्म्युल्याचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसनं आतापर्यंत चार उमेदवार याद्या जाहीर केल्यात त्यात 99 उमेदवार घोषित केलेत.. त्यामुळे मविआतील 90च्या फॉर्म्युल्याचं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय. तर मविआतील तिन्ही पक्षांकडून उमेदवार काही मतदारसंघातून उमेदवार देण्यात आलेत... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2024, 09:09 वाजता

पुण्यात अमोल बालवडकर निवडणूक लढवण्यावर ठाम

 

Maharashtra Election 2024 : पुण्यातील भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही अमोल बालवडकर कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यमान आमदार आणि मत्री चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिलीय. चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. असं असताना अमोल बालवडकर देखील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. बालवडकरांच्या बंडखोरीमुळे भाजपसह चंद्रकांत पाटलांची डोकेदुखी वाढणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2024, 08:41 वाजता

चार्टर विमान,हेलिकॉप्टर घिरट्या वाढणार

 

Maharashtra Election 2024 : विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने नेत्यांचे दौरेही वाढलेत. या दौऱ्यांसाठी नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर विमानं बूक केलीयेत. त्यामुळे आचारसंहितेपर्यंत 40 हेलिकॉप्टर आणि विमानं चार ते साडेचार हजार वेळा उड्डाणं करणार आहेत. यामधून जवळपास 400 कोटींची उलाढाल होणार आहे.या चार्टर विमान आणि हेलिकॉप्टरचं भाडं अडीच लाख ते सहा लाखांपर्यंत आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2024, 08:31 वाजता

विकासकामांच्या जोरावर विजयी होणार - भावना गवळी

 

Maharashtra Election 2024 : वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधून भावना गवळींना उमेदवारी देण्यात आलीय.. शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलीय... मतदारसंघात केलेल्या विकासकामाच्या जोरावर आपणच जिंकू असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केलाय.. रिसोडच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झाला होता.. अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडे रिसोडची जागा आलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -