Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

22 Sep 2024, 08:56 वाजता

हिंगोलीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

 

Hingoli : विधानसभेच्या तोंडावर  हिंगोलीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय...सातव आणि भाऊराव पाटील गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय.. काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी कुणाल चौधरी यावेळी सत्कार समारंभात जोरदार घोषणा देण्यात आल्यात तर शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातव गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केलीय.. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालंय.. त्यानंतर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातलाय..  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Sep 2024, 08:41 वाजता

मराठा आंदोलकांकडून जालना आणि परभणी बंदची हाक

 

Parbhani & Jalna Close : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना आणि परभणी बंदची हाक देण्यात आलीय. मराठा आंदोलकांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय.. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.

22 Sep 2024, 08:32 वाजता

पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

 

Pune : पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील कसबा पेठेत गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. दहशतवाद माजवण्यासाठी मागील काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड केली जातेय. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाड्यांचा काचा अज्ञात व्यक्तींनी फोडल्यात. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

22 Sep 2024, 07:54 वाजता

बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर

 

Baramati : बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेत.. शहरात अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे मोठं मोठे बॅनर लावण्यात आलेत..  तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार असे बॅनर झळकलेत.. त्यामुळे सुळे आणि युगेंद्र यांच्या बॅनरची आता राज्यात चर्चा होतेय.. 

22 Sep 2024, 07:51 वाजता

मराठा आंदोलक आझाद मैदानात धडकले

 

Mumbai Maratha Andolak : मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर धडकलेत.. मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक वर्ष उलटुनही अजूनपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणा देत आरक्षणाची मागणी लावून धरली.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी त्यांनी लावून धरलीय.. त्यानंतर  शंभुराज देसाई यांनी आंदोलकांची भेट घेऊन आज त्यांची भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलंय.. त्यामुळे आज मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे..