Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Sep 2024, 15:35 वाजता

गुहागरमध्ये महायुतीत वाद?

 

Guhagar Mahayuti : रत्नागिरीतील गुहागरमधून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पितृपक्षानंतर उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार विनय नातूही निवडणुकीच्या तयारीला लागल्याने महायुतीत मोठा पेच निर्माण होणार आहे. गुहागरच्या जागेसाठी भाजपची समजूत काढण्याचं आव्हान. श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेसमोर असणार आहे. दरम्यान, इथले विद्यमान आमदार भास्कर जाधव आहेत. त्यामुळे, विधानसभेत भास्कर जाधव विरुद्ध विपुल कदम अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होणार का, याकडेही लक्ष लागलंय. श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम हे खेडमधील तळे गावचे रहिवासी आहेत. 

30 Sep 2024, 14:11 वाजता

शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला

 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी आहे.. कॅबिनेट बैठकीत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलाय.. मराठा समाजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

30 Sep 2024, 13:53 वाजता

लाडकी बहीण योजनेत फसवणूक

 

Nanded Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय.. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केलीय.. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. मनाठा गावातील सीएससी केंद्रचालकानच हा प्रकार केलाय.. सचिन थोरात या तरुणानं रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो असं सांगून आधारकार्ड आणि बँक पासबुक जमा केलेत... मात्र त्याचा दुरुपयोग करून लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरून फसवणूक केलीय.. महिलांच्या आधारकार्डवर खाडाखोड करून त्यावर पुरुषांचे आधारकार्ड आणि बँक पासबुक लावलेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Sep 2024, 12:50 वाजता

आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण द्यावं - मनोज जरांगे

 

Manoj Jarange : आचारसंहितेआधी मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर निवडणूक घेऊनही तुम्हाला पश्चाताप होईल, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय. संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जरांगेनी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

30 Sep 2024, 12:47 वाजता

मुळशीत ड्रोनची दहशत

 

Pune Drone : मुळशी भागात दोन दिवसांपासून रात्रीच्यावेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरतायेत. एकाचवेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसतायेत. हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत आणि कशासाठी घिरट्या घालतायेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अगदी हिंजवडी आयटी पार्कपासून भूगाव, पौडपर्यंत या ड्रोनची दहशत पसरलीये. तर दुसरीकडे मावळ तालुक्यात रात्रीच्या वेळेस ड्रोन कॅमेरा घिरट्या घालताना आढळून आलाय..पाचाणे, पुसाणे, चांदखेड, आणि दांरूब्रे गावावर ड्रोन फिरत होते....त्यामुळे ग्रामस्थांनी शिरगावं पोलिसांकडे धाव घेतली..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Sep 2024, 12:35 वाजता

मनसे फडणवीसांविरोधात लढणार?

 

MNS Nagpur Candidate : मनसेनं नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केलीय.. राज ठाकरेंनी नागपूरमधील सर्व 6 विधानभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसे त्यांनी सांगितलंय.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Sep 2024, 11:47 वाजता

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

 

Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय.. सिनेविश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर याबात घोषणा केलीये..

बातमी पाहा - ज्येष्ठ अभिनेते Mithun Chakraborty यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

30 Sep 2024, 11:44 वाजता

मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का? - संजय राऊत

 

Sanjay Raut On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का असा खोचक सवाल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना विचारलाय.. ठाकरेंवर टिका करण्यापूर्वी भूतकाळ विसरू नका अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीये.. 

30 Sep 2024, 11:32 वाजता

अहेरीची जागा काँग्रेस लढवणार - विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar : अहेरी विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी,अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य उमदेवाराला इथून संधी देण्याची गरज असल्याचंही वडेट्टीवार म्हणालेत.मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री यांना अहेरीतून मैदानात उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Sep 2024, 10:57 वाजता

सरकार म्हणजे विषकन्या - नितीन गडकरी

 

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी राजकीय पक्षांबाबत केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होते.  सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यापासून दूर राहिलं पाहिजे.. कारण सरकार म्हणजे विषकन्या असते असं मोठं विधान नितीन गडकरींनी केलंय.. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या भरोशावर राहू नका असा सल्लाही नितीन गडकरींनी उद्योजकांना दिलाय.. नागपूरमधील विदर्भ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट कौन्सिलच्या कार्यक्रमात ते बोलत होते..

बातमीचा व्हिडीओ पाहा -