Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Sep 2024, 22:23 वाजता

लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप

 

Laxman Hake Video Viral :  मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना विचारला जाब..हाकेंसमोर मराठा तरुणांची घोषणाबाजी...लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप...लक्ष्मण हाकेंना जाब विचारण्याचा व्हिडिओ व्हायरल

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Sep 2024, 20:43 वाजता

इंदापुरात अज्ञाताकडून तरुणावर गोळीबार

 

Indapur Firing : इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. आणि या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय…राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय. त्याला तीन राउंड लागले असल्याची माहिती मिळतीये. घटना घडतात इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरुये..

30 Sep 2024, 19:33 वाजता

'शरद पवार महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब', गोपीचंद पडळकरांची टीका

 

Gopichand Padalkar on Sharad Pawar : शरद पवार महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब असल्याचं घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर येथे शरद पवार गेल्यानंतर काही लोकांनी आम्हाला अहमदनगर असंच नाव हवं आहे. त्याचा नामांतर करू नये अशी मागणी केली. त्यांच्यासमोर घोषणाबाजी दिली तर ही घोषणा देणारे कोण आहेत. आणि शरद पवारांसमोर या घोषणा का दिल्या औरंगजेबाचे अवशेष अंश अजून जिवंत आहेत. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब असल्याची टीका आमदार पडळकरांनी शरद पवारांवर केलीये...
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Sep 2024, 19:05 वाजता

'फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले', सिद्धार्थ मोकळेंचा गौप्यस्फोट

 

Siddharth Mokale : वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक सनसनाटी राजकीय दावा केला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये चर्चा सुरु असल्याचा खळबळजनक दावा मोकळेंनी केलाय.. मोकळेंनी प्रसिद्धी पत्रकात एक दावा केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Sep 2024, 18:17 वाजता

 अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर

 

Amit Shah : उद्या अमित शाहा मुंबईत...मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा...नवी मुंबईतही अमित शाहांची बैठक...वाशी सिडको सेंटरमध्ये अमित शाहा घेणार बैठक...दुपारी 3 वाजता नवी मुंबईतील आरएसएस पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाहा घेणार बैठक 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Sep 2024, 17:38 वाजता

फेक नरेटिव्हबाबत भाजप जनजागृती करणार

 

BJP : संविधान बदल आणि आरक्षणाच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपची नवी स्ट्रेटजी..फेक नरेटिव्हबाबत भाजप जनजागृती करणार...महाराष्ट्र भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचा उपक्रम 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Sep 2024, 17:09 वाजता

12 जानेवारी 2025ला प्रयागराजमध्ये कुंभमेळा

 

Prayagraj Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा होणार आऐहे.. 12 जानेवारीला प्रयागराज इथं कुंभमेळा होणार आहे.. त्यासाठी 30 ते 50 कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.. तर कुंभमेळाव्यासाठी 933 कोटी रुपये खर्च होणार आहे.. त्यासाठी रेल्वेनंही विशेष तयारी केलीय... रेल्वेकडून 992 विशेष ट्रेनची व्यवस्था केलीय.. परिसरात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे तर हॉस्पिटल आणि इतर सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Sep 2024, 16:37 वाजता

देशी गायींना 'राज्यमाता-गोमाते'चा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा

 

Desi Cow : महाराष्ट्रातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आलाय.. हा मोठा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.. सोबतच महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.. अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय.

30 Sep 2024, 16:07 वाजता

तिरुपती मंदिर लाडू प्रसादप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

 

Tirupati Laddu : तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी मोठी बातमी...प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरल्याचं दिसत नाही असं निरीक्षण नोंदवत, सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच लाडू प्रसाद तपासाचा निकाल निघाला नसताना माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती, असा सवालही सुप्रीम कोर्टानं केला. यावरुन सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याना खडेबोल सुनावले. 

30 Sep 2024, 15:52 वाजता

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये राडा 

 

Sindhudurg Zilla Parishad Rada : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं..सावंतवाडी पंचायत समिती इमारतीचा कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या हेतूने आज पेपर सबमिशन ठेवण्यात आलं होतं. मात्र ठेका मिळवण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेलं खाजगी गुंडाने सकाळपासून दहशत माजवली होती. याविरोधात ठाकरे गटाकडून खाजगी गुंडाना चोप देण्यात आला.