30 Sep 2024, 10:33 वाजता
रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दापोली मतदारसंघातून उभं राहावं असं आव्हान रामदास कदम यांनी दिलंय.. दापोलीतील जनता आदित्य आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार असल्यांची रामदास कदम म्हणालेत. ठाकरेंनी आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचंही कदम म्हणालेत... तर आनंद दिघे यांचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं होतं असा आरोपही त्यांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 09:19 वाजता
उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीवर CCTVची नजर
Ulhasnagar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अखेर ६ दिवसानंतर काल उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. मात्र या दफन विधीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षानं विरोध केला होता.. त्यामुळे दफनविधीनंतर स्मशानभूमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.. या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत.. तसंच पोलिसांकडूनही स्मशानभूमीत बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 08:59 वाजता
नरहरी झिरवाळांचं सरकारविरोधात आंदोलन
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ सरकार विरोधातच आक्रमक झालेत.. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिके विरोधात नरहरी झिरवाळ आजपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. धनगर आरक्षण तसंच पेसाभरतीच्या प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मंत्रालयासमोर धरणे आंदोलनाला बसणार आहेत. मंत्रालयाजवळी गांधीपुतळ्याजवळ सकाळी 10वाजता त्यांचं हे आंदोलन सुरु होणार आहे.. त्यांच्या या आंदोलनात राज्याती विविध आदिवासी संघटनाही सहभागी होणार आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 08:40 वाजता
जागावाटपात आम्ही मविआच्या खूप पुढे - सुनील तटकरे
Sunil Tatkare : विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा खूप पुढे गेलीय. जागा वाटपात आम्ही महाविकास आघाडीच्या कोसो दूर पुढे सहमतीवर आलो असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. चर्चा अतिशय समाधानकारक असून २८८ जागा लढायच्या आणि बहुमत आणायचं या दृष्टीकोनातून चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. महायुतीचे विभाग निहाय मेळावे आणि जिल्हास्तरीय बैठका यांचे नियोजन पुढच्या काही दिवसात केलं जाईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 08:13 वाजता
खासदार प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप
Praniti Shinde On BJP : हिंदू-मुस्लिमचा वाद भाजपने आपल्या देशात पेटवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. जात-पात-धर्मावर भाजपने राजकारण केलं ज्याला अनेकजण बळी पडले असंही त्या म्हणाल्या. आपण सगळे हिंदू आहोत, कदाचित देवधर्म मी जास्त करते मात्र धर्माच्या नावावर कधीही राजकारण करत नाही.. धर्माच्या नावावर मतदानही मागितलं नाही... लोकसभा निवडणुकीत आपल्या देशाला कीड लागली, बुरशी लागली..अशी टीका प्रणिती शिंदेंनी सरकारवर केली.ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी, उद्या कामं करणारी लोकं राहणार नाहीत अशी खंतही प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 08:07 वाजता
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक
Cabinet Meeting : आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत...सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी, मृत्यूनंतर मिळणारी ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 20 लाखांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार निर्णय...डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढवण्यात येणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 07:57 वाजता
राज्यातील खासगी बालवाडी शाळांसाठी कायदा तयार
New Law For Pre School : राज्यातील खासगी बालवाडी शाळांसाठी कायदा तयार करण्यात आलाय.. या कायद्याचा मसुदा विधी विभागाकडे पाठवण्यात आलाय.. येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा कायदा मंजूर होणं अपेक्षित आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी दिलीये.. येत्या शैक्षणिक वर्षापासून बालवाडीच्या मुलांना शिक्षण विभागाचा अधिकृत अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पुस्तकही तयार करण्यात आलीत.. कायद्याची अंमलबजावणी झाली की बालवडी शाळा सुरु करण्यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे.. तसंच सरकारनं तयार केलेला अभ्यासक्रमच शिकवावा लागणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 07:48 वाजता
मविआची जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक
Mumbai Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक आज होणार आहे...मुंबईत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे.. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सलग 2 दिवस मविआच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या जागावाटप संदर्भात बैठका होणारेत. गेल्या आठवड्यात तिन्ही पक्षांतील नेत्यांनी सर्व 288 जागांचा आढावा घेत चर्चा केली होती. मात्र त्यापैकी जवळपास 30 ते 35 जागांवर मविआतील पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे तिढा असलेल्या या जागांवर आता दुस-या टप्प्यातील जागावाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Sep 2024, 07:45 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरेठ झिजवणे, ही भीक असते अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.. त्यामुळे काही लोकं हातास आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवता हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका शिंदेंनी केलीय. लोकांना देणं माहीत नाही फक्त घेणं माहीत असल्याची टीकाही शिंदेंनी ठाकरेवर केलीय.. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले हे लक्षात ठेवा असंही शिंदे म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -