Maharashtra Breaking News Today LIVE Updates:एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याला नवीन सरकार कधी मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्तर आजच मिळतील. दिवसभारतील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा

24 Nov 2024, 21:22 वाजता

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये कॅान्फरन्स फोनवरून सविस्तर चर्चा झाली.

सरकार स्थापनेसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

तसेच दिल्लीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत उद्या चर्चा होणार असल्याची माहिती.

दिल्लीतील बैठक संपल्यावर मुंबईत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार

24 Nov 2024, 20:42 वाजता

वर्षावर महिलांकडून एकनाथ शिंदेंचं औक्षण

वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला महिलांची गर्दी झाली आहे. यावेळी महिलांकडून एकनाथ शिंदे यांचं औक्षण करण्यात आलं. तसंच लाडकी योजनेबाबत धन्यवाद मानले. पुढील ५ वर्षांसाठी शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजे असं यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

24 Nov 2024, 20:16 वाजता

शिवसेना मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार- सूत्र 

जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार

जुन्या वादग्रस्त मंदिरांचा नवीन मंत्रिमंडळात पत्ता कट

24 Nov 2024, 20:14 वाजता

केंद्रीय वाहतूक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सागरवरून निघाले. ते अडीच तास सागरवर होते.

 

24 Nov 2024, 19:46 वाजता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांचे सूचक ट्विट 

येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये काही आमदारांचा प्रवेश होणार का? पार्थ पवारांच्या ट्विटमुळे शरद पवारांच्या पक्षातील कोणी आमदार अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचे सूचक संकेत 

महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्व आमदारांचे मी स्वागत करतो. आपण सर्व अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येऊन महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जाऊ अशा प्रकारचे त्यांनी सूचक ट्विट केले

24 Nov 2024, 19:38 वाजता

रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर दाखल

 

24 Nov 2024, 19:08 वाजता

अजित पवारांकडून शरद पवारांचे आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न

अजित पवारांकडून शरद पवारांचे आमदार आणि प्रतिनिधी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.यासंदर्भात अजित पवारांकडून शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांना आणि निवडून आलेल्या आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.

24 Nov 2024, 18:50 वाजता

मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता

आयोगाच्या निकष आहे कुठलाही पक्षाला 8% किंवा 6% किंवा 3% टक्के मत नाय भेटला तर त्या पक्षाचं मान्यताराद्य होण्याची शक्यता होती.त्याच प्रमाणे त्या पक्षाला एक दोन किंवा तीन आमदार निवडून आला पाहिजे.मात्र मनसेला या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार किंवा टोटल मतदानाचा टक्केवारी मध्ये  सहा,सात,आठ टक्के पेक्षा कमी मत मिळाल्यामुळे मनसेचे मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.

24 Nov 2024, 18:31 वाजता

शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत बैठक 

शरद पवारांच्या उपस्थितीत कराडच्या हॉटेल मध्ये बैठक सुरू झाली आहे.कराड भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रमुख कार्यकर्त्यांची ही बैठक होते आहे.या मध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघात झालेल्या पराभवाचा कारणांवरून चर्चा सुरू आहे.

24 Nov 2024, 18:18 वाजता

प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला 

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी निवडणुकीत दिलेल्या योगदानबद्दल फडणवीसांनी समाधान व्यक्त केले. तसेच आमदार प्रवीण दरेकर यांचे कौतुक केले.