Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...   

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आज किंवा उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची माहिती.15व्या विधानसभेची अधिसूचना राज्यपालांकडून जारी. आता उत्सुकता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंबंधीच्या नावाची.... पाहा दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... 

25 Nov 2024, 21:09 वाजता

मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय पाहुयात...

फॉर्म्युला क्रमांक-1 

शिवसेना 1 वर्ष राष्ट्रवादी 1 वर्ष आणि भाजपला 3 वर्ष अशी मुख्यमंत्रिपदाची वाटणी होऊ शकते 

फॉर्म्युला क्रमांक-2

भाजपला 5 वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला महत्वाची खाती अशीही सत्तापदांची विभागणी होऊ शकते

फॉर्म्युला क्रमांक-3

भाजपला 2.5 वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला 15 महिने शिवसेनेला 15 महिने मुख्यमंत्रिपद मिळू शकते.

 

25 Nov 2024, 21:00 वाजता

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज रात्रीच शिक्कामोर्तब 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज रात्रीच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत रात्री बैठक होणार असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज रात्रीच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

 

 

25 Nov 2024, 20:26 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल

देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आधी फडणवीस ओम बिर्ला यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची  भेट घेणार आहेत. रात्री त्यांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा होणार आहे.

25 Nov 2024, 19:29 वाजता

अमित शाह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता 

 निरीक्षक म्हणून अमित शाह उद्याच मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. अमित शाह स्वतः महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत लक्ष घालणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. 

25 Nov 2024, 19:14 वाजता

भास्कर जाधवांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आलीये. प्रतोपपदी सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा वर्णी लागलीये. तर विधीमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीये. दरम्यान विधानसभा गटनेतेपदी आदित्य ठाकरे असावेत अशी माझी इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपली निवड केल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

25 Nov 2024, 19:10 वाजता

मंत्रिपद मिळावं अशी इच्छा : अर्जुन खोतकर

आपण 8 टर्म आमदार झालो आहे. त्यामुळे आता आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा असल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी बोलून दाखवलं आहे. 

25 Nov 2024, 18:49 वाजता

ठाकरे गटाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची उद्या मातोश्रीवर बैठक

ठाकरे गटाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची उद्या दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर बैठक. पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. आज विजयी उमेदवारांची मातोश्रीवर बैठक पार पडली. 

25 Nov 2024, 18:14 वाजता

...तर उद्धव ठाकरेंचे 2 आमदार शिल्लक राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार त्यांना पुरून उरतील असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, आता त्यांचे 20 आमदार आहेत त्यामधील फक्त 2 शिल्लक राहतील आणि बाकीचे 18 गायब होतील. 

25 Nov 2024, 17:33 वाजता

भाजपचे नवे मिशन, महापालिका इलेक्शन  

महाराष्ट्र जिंकल्यानंतर स्थानिक निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. विधानसभा इतकेच बळ महापालिका, नगरपालिकासाठी लावणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सूचना.

25 Nov 2024, 17:17 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये रात्री बैठक होणार आहे.