Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आज किंवा उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची माहिती.15व्या विधानसभेची अधिसूचना राज्यपालांकडून जारी. आता उत्सुकता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंबंधीच्या नावाची.... पाहा दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
25 Nov 2024, 10:14 वाजता
पराभवाचं खापर एका व्य़क्तिवर फोडता येत नाही- संजय राऊत
पराभवाचं खापर एका व्य़क्तिवर फोडता येत नाही. अपयशाची कारणं शोधली पाहिजे. हा पराभव व्यक्तिगत एका पक्षाचा नाही. विरोधक ज्या पद्धतीनं निवडणूक लढण्यासाठी उतरले होते ती मी योग्य पद्धत मानत नाही. आम्ही तीन पक्ष मिळून निवडणूक लढलो, हे महाविकासआघाडीचं अपयश आहे. आता दिल्ली ठरवेल तोच मुख्यमंत्री महाराष्ट्राला द्यावं लागेल, असं संजय राऊस सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.
25 Nov 2024, 09:44 वाजता
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची काय रणनिती?
विधानसभेच्या पराभवानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुंबईतील पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक. नितीन सरदेसाई, माऊली थोरवे, महेंद्र भानुशाली, प्रदीप वाघमारे हे या बैठकीसाठी उपस्थित.
25 Nov 2024, 09:26 वाजता
सीएम पदाच्या फॉर्म्युलाविषयी अजित पवार म्हणाले...
'काही नाही, आम्ही तिघं बसू आणि ठरवू', इतक्या मोजक्या शब्दांत अजित पवार यांनी कराडमध्ये बोलताना सीएम पदाच्या फॉर्म्युलाविषयी वक्तव्य केलं. राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
25 Nov 2024, 09:19 वाजता
माझे ते काका आहेत म्हणून...; काकांपुढे नतमस्तक होणाऱ्या रोहित पवारांची प्रतिक्रिया
'माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आहे पण शेवटी जी काही संस्कृती आहे. एक वडिलधारी व्यक्ती आणि माझ्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे काका असल्यामुळं शेवटी संस्कृती असल्यामुळं पाया पडणं ही जबाबदारी आहे. ही (कराडची) जी भूमी आहे, तिथं भेदभाव करून चालत नाही, इथं संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती पाळतो', असं रोहित पवार म्हणाले.
25 Nov 2024, 09:14 वाजता
प्रीतीसंगमावर 'दादा'गिरी
कराडमध्ये प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट. 'माझी सभा झाली असती तर काय झालं असतं...' असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला. यावेळी दर्शन घे काकाचं असं म्हणताच काकाच्या पाया पडत अर्थात अजित पवार यांच्यापुढं नतमस्तक होत रोहित पवारांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला. पण, 'थोडक्यात वाचला...' असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोलाही लगावल्याचं पाहायला मिळालं.
25 Nov 2024, 09:08 वाजता
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, यामध्ये वक्फ बोर्ड विधेयक, गौतम अदानींवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशनात आज 16 विधेयकं सादर होण्याची शक्यता असून यामध्ये अदानींच्या मुद्द्यावरूनदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
25 Nov 2024, 09:02 वाजता
दिल्लीतून ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचालींना वेग आला असून, महायुतीचे नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलण्याची शक्यता आहे. दिल्लीतील चर्चेनंतर सीएम, डीसीएमचा निर्णय होणार असून, शपथविधीची तारीखही दिल्लीतील बैठकीनंतरच निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
25 Nov 2024, 08:53 वाजता
पटोले कसेबसे निवडून आले, थोरात, पृथ्वीराज सगळे साफ झाले - अशोक चव्हाण
'ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले. मुलीच्या विजयानंतर मुदखेड मध्ये आयोजित एका आभार सभेत चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. लातूरमध्ये एक पडला दुसरा निसटता निसटता आला, महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे भोकरच्या नावाने बोंबलून निघणारे प्रदेशाध्यक्ष दिडशे मतांनी कसेबसे निवडून आले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झाले', असे अशोक चव्हाण म्हणाले.
25 Nov 2024, 08:49 वाजता
भाजपाचा अनोखा विजयी जल्लोष
धुळे शहर विधानसभेत भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल विक्रीमि मताधिक्याने निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह अजूनही ओसंडून वाहत आहे. धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने विजय उत्सव साजरा केला. या ठिकाणी एमआयएमचा निवडणूक चिन्ह असलेले मोठी पतंग तयार करण्यात आले होती. या पतंग वर पतंग कटली असे लिहिण्यात आलेलं होतं. ही भली मोठी पतंग फाडत त्यातून अनुप अग्रवाल यांची प्रतिमा घेत नगरसेविका बाहेर पडल्या. त्यावेळेस भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते. एम आय एम चे आमदार फारुक शहा यांना पराभूत करत अनुप अग्रवाल या ठिकाणी विजयी झालेले आहेत.
25 Nov 2024, 08:49 वाजता
यशोमती ठाकूर यांच्यावर सर्वसामान्य माणसाचा रोष होता- राजेश वानखेडे
माजी मंत्री आणि काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपच्या राजेश वानखडे यांनी पराभव करत यशोमती ठाकूर यांना धक्का दिला विजयानंतर आमदार राजेश वानखडे यांनी प्रतिक्रिया देत यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली माझ्यासमोर पैशाच आव्हान होत फक्त पैशाचा जो चिखल केला त्या चिखलात कमळ फुललं यशोमती ठाकूर यांच्यावर सर्वसामान्य माणसाचा रोष होता त्यांनी कुठल्याही प्रकारे विकास काम केले नाही युवकांना रोजगार दिला नाही कौंडन्यापूर, वलगाव व मोझरी विकास आराखड्याचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांनी केला आहे.