Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आज किंवा उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची माहिती.15व्या विधानसभेची अधिसूचना राज्यपालांकडून जारी. आता उत्सुकता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंबंधीच्या नावाची.... पाहा दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
25 Nov 2024, 16:52 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणार सुनावणी. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
25 Nov 2024, 16:43 वाजता
निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा झाली, पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
आज शरद पवार साहेबांशी भेट झाली. सदस्य म्हणून आम्ही उपस्थित होते. राजकीय काहीही चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा झाली असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
25 Nov 2024, 16:04 वाजता
आरक्षण द्या, अन्यथा राज्यात फिरु देणार नाही : मनोज जरांगे
पूर्वीही महायुतीचंच सरकार होतं आणि आताही महायुतीचंच सरकार आलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाहीतर महायुतीच्या नेत्यांचं राज्यात फिरणं अवघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर उपोषणाला सुरूवात होणार असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.
25 Nov 2024, 15:59 वाजता
मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही : नाना पटोले
मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. नाना पटोले यांची माहिती. राज्यातील निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबाबत दिल्लीत पटोलेंची खरगेंशी चर्चा.
25 Nov 2024, 15:39 वाजता
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. वाय.बी. सेंटर येथे आज शरद पवारांनी नवर्निर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शरद पवार देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.
25 Nov 2024, 15:00 वाजता
नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग
नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरवात. संजय शिरसाठ, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. मंत्रीपद मिळवण्यासाठी इतर इच्छुक आमदारही एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
25 Nov 2024, 14:35 वाजता
आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी
विधानसभा निवडणुकीनंतर भास्कर जाधव यांच्यावर गटनेतापदाची जबाबदारी तर, सुनील प्रभू प्रतोत. आदित्य ठाकरेंवर विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी.
25 Nov 2024, 14:17 वाजता
काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमित देशमुख मुंबईकडे रवाना
काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमित देशमुख तातडीने मुंबईकडे रवाना. नाना पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांकडे येण्याची शक्यता.
25 Nov 2024, 14:09 वाजता
पक्षाकडून दिलेली जबाबदारी पार पाडणार : विजय वडेट्टीवार
नाना पटोलेंनी हायकमांडकडे मांडलेल्या भूमिकेबाबत माहिती नाही. मात्र, पक्षाकडून दिलेली जबाबदारी पार पाडणार. पक्ष जो आदेश देईल तो मान्य. नेतृत्व बदलावर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
25 Nov 2024, 13:12 वाजता
काँग्रेसने नाना पटोलेंचा राजीनामा घ्यावा- आशिष देशमुख
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने नाना पटोलेंचा राजीनामा घ्यावा, असं वक्तव्य भाजप नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केलंय. तर ते पुढे म्हणाले की, पटोले राजीनामा देतील असं वाटत नाही, असं ते म्हणाले. तर 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा', असंही ते यावेळी म्हणाले.