Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आज किंवा उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची माहिती.15व्या विधानसभेची अधिसूचना राज्यपालांकडून जारी. आता उत्सुकता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंबंधीच्या नावाची.... पाहा दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
25 Nov 2024, 13:05 वाजता
'या' तारखेला होणार शपथविधी? सूत्रांची माहिती
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी होण्याची दाट शक्यता असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे.
25 Nov 2024, 12:09 वाजता
पवार कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक करार झाला होता- राम शिंदे
कर्जत जामखेडमधील पराभवानंतर राम शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. पवार कुटुंबात करार झाल्याचं म्हणताना, 'मला हे आधीपासूनच माहिती होत पण आज अजित पवार यांनी स्वतः सांगितलं. त्यांचं ठरलं होतं. कर्जत जामखेड मध्ये अजित पवार येणार नाहीत आणि बारामतीत रोहित पवार जाणार नाहीत, राष्ट्रवादीत दोन गट पडले आता या फुतीवर देखील संशय आहे. मी अजित पवार यांना अनेक वेळा सांगितलं की माझ्या मतदारसंघात सभा घ्या ( त्यांनी दादांचे केलेलं msg दाखवले). अजित पवार यांनी युती धर्म पाळला नाही' असं ते म्हणाले. आपण एक सामान्य कर्तकर्ता असून, आपल्याविरोधात कट रचला गेल्याचं ते म्हणाले.
25 Nov 2024, 11:57 वाजता
विदर्भातून मंत्रिपदासाठी दावेदार कोण?
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, कृष्णा खोपडे
चंद्रपूर
सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडीया
गडचिरोली
धर्मरावबाबा आत्राम, अहेरी
अकोला
रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे
यवतमाळ
अशोक उइके, संजय राठोड
अमरावती
रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड
भंडारा
नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके
बुलडाणा
संजय कुटे, जळगाव जामोद
25 Nov 2024, 11:44 वाजता
भारताच्या सागरी हद्दीत मोठा ड्रग्ज साठा जप्त
भारताच्या सागरी हद्दीत मोठा ड्रग्ज साठा जप्त. भारतीय तटरक्षक दलाने अंदमानमध्ये पाच टन ड्रग्ज जप्त केल्याची माहिती.
25 Nov 2024, 11:33 वाजता
आपल्या विरोधात नियोजित कट रचला- राम शिंदे
निवडणुकीत आपल्या विरोधात नियोजित कट रचला, असं म्हणत कटात अजित पवारांचा सहभाग असल्याचा संशय राम शिंदेंनी केला.
रोहित पवार स्वत:ला सीएम समजत असल्याचीही टीका त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.
25 Nov 2024, 11:08 वाजता
महायुतीला राजकीय संकटात आणणाऱ्यांना... शिंदे- फडणवीस बैठकीत मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली, सोबतच दोघांनी आपल्या पक्षातील संभाव्य मंत्री यांच्यावर चर्चा केली. गेल्या मंत्रिमंडळात ज्या आमदारांनी महायुतीमध्ये तेढ निर्माण केले आणि महायुतीला राजकीय संकटात आणलं त्यांना मंत्रिमंडळातून लांब ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
25 Nov 2024, 10:55 वाजता
ऐतिहासिक विजयानंतर भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक
ऐतिहासिक विजयानंतर भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची दुपारी महत्वाची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रदेश मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
25 Nov 2024, 10:40 वाजता
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
नव्या खासदारांना बोलू दिलं जात नाही, असं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधतांना मोदींनी स्पष्ट करत नाराजीचा सूर आळवला. काही विरोधी पक्ष जबबादारीनं काम करतात, पण काहींच्या कामावर मात्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेनं सातत्यानं ज्यांना नाकारलं आहे ते मात्र लोकशाहीच्या भावनांचा अनादर करतात. मी आशा करतो की आमच्या नव्या साथीदारांना संसदेत बोलण्याची संधी मिळेल. सर्व पक्षांमध्ये नवे चेहरे आहेत. त्यांच्याकडे नवे विचार, नव्या कल्पना आहेत. आज सारं जग आशेच्या नजरेनं भारताकडे पाहत आहे, त्यामुळं आम्ही संसदेच्या वेळेचा उपयोग भारताप्रती वाढलेल्या आकर्षणाला आणखी बळ देण्याच्या हेतूनं खर्ची घालू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
#WATCH | #ParliamentWinterSession | Prime Minister Narendra Modi says "The last phase of 2024 is underway and the country is preparing for 2025. This Session of Parliament is special in several ways and the most important thing is the beginning of the 75th year of the… pic.twitter.com/lRgEy6lPr3
— ANI (@ANI) November 25, 2024
25 Nov 2024, 10:22 वाजता
नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभवची नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेस नेते नाना पटोले मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही भेटण्याची शक्यता.
25 Nov 2024, 10:17 वाजता
20 वर्षांनंतर काँग्रेसला अकोला जिल्ह्यात मिळाला आमदार
सर्वाधिक उत्कंठावर्धक निकाल लागलाय तो अकोला पश्चिम मतदारसंघात. जिल्ह्याचच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच लक्ष या निकालाकडे होतं. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली,त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि याचाच फटका भाजपला बसलाय.. विधानसभेत अकोल्यातून गेल्या दोन दशकांपासून गायब झालेली काँग्रेसने ''' कम बॅक ''' केलंय. अकोला जिल्ह्याला बाळापूर मतदार संघातून 1999 - 2004 या काळात लक्ष्मणराव तायडे यांच्या स्वरूपात काँग्रेसला शेवटचे आमदार मिळाले होते..तर आता 2024 महणजेच 20 वर्षा नंतर काँग्रेसला जिल्ह्यात आमदार मिळालाय. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी अवघ्या 1283 मतांनी विजय मिळविला. तर ''एक है तो सेफ है'' चा नारा काँग्रेससाठी याठिकाणी फायद्याचा ठरला असल्याचं काँग्रेसच्या विजयी उमेदवारने म्हटलं आहे.