Maharashtra Breaking News LIVE Updates: आज देशभरामध्ये नाताळ मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
25 Dec 2024, 18:27 वाजता
उदय सामंत यांची केसरकरांच्या नाराजीवर प्रतिक्रिया
दीपक केसरकर काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, दिपकभाई मला वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत ते बोलत असताना आपण आपल विद्ववता व्यक्त करणं योग्य वाटत नाही
25 Dec 2024, 17:46 वाजता
महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पाऊस?
पुढील चार दिवसांत राज्यात पावसाचा इशारा
राज्यात सध्या थंडी कमी झाली असून ढगाळ वातावरण आहे
हवामान विभागाने पुढील चार दिवसांत पावसाचा इशारा दिला आहे
25 Dec 2024, 16:43 वाजता
दिल्ली - संसद परिसरात एका माणसाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
जखमी अवस्थेत त्याला आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं
जितेंद्र असे स्वत:ला पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे
तो उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे
घटनास्थळावरून एक वही सापडली आहे
25 Dec 2024, 14:05 वाजता
दिल्लीत एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसची अनुपस्थिती
दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रतिनिधींची अनुपस्थिती
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत असल्याची माहिती तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मतदारसंघातील पूर्वनियोजित कामात व्यस्त
खासदार प्रफुल्ल पटेल देखील बाहेरगावी असल्याची माहिती
25 Dec 2024, 12:38 वाजता
...म्हणून मोठा विजय मिळाला; नागपूरमध्ये फडणवीसांनी सांगितलं विधानसभेच्या विजयाचं गुपित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर प्रेस क्लबकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "लोकसभेतला फेक नेरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो. त्यामुळे हा सर्वात मोठा विजय मिळवू शकलो," असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "आता जबाबदारी वाढली आहे कारण जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत," असंही फडणवीस म्हणाले.
25 Dec 2024, 11:48 वाजता
कल्याण लैंगिक अत्याचार-हत्या प्रकरण: मुख्य आरोपीला अटक
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीची अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेगाववरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंनी ही माहिती दिली.
25 Dec 2024, 11:44 वाजता
कल्याणमधील मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात नागरिक रस्त्यावर
कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला. देशात आणखी किती निर्भया होणार आहेत? कधी थांबणार महिलांची अवहेलना? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
25 Dec 2024, 11:29 वाजता
मुंबई BJP ची महत्त्वाची बैठक! मोठ्या निर्णयाची शक्यता
मुंबई भाजप कोअर कमिटीची आज दुपारी बैठक पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित राहणार असून शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने नव्या अध्यक्ष निवडीबाबतही चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
25 Dec 2024, 10:49 वाजता
उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत जाणार आहेत. पदभार स्वीकारल्यावर शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे.
25 Dec 2024, 09:27 वाजता
CM फडणवीसांचा 100 दिवसांचा Action Plan; लवकरच...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या अॅक्शन प्लानचा आढावा घेतला आहे. आता देवेंद्र फडणवीस प्रत्येक खातेनिहाय आढावा घेणार असून लवकरच अॅक्शन प्लान निश्चित केला जाणार आहे. यामध्ये कृषी, गृहनिर्माण, जलसंपदा आणि ऊर्जा विभागाचा सुरूवातीला आढावा घेण्यात आला आहे.