Maharashtra Breaking News LIVE Updates: आज देशभरामध्ये नाताळ मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
25 Dec 2024, 06:41 वाजता
फडणवीसांची आज दुपारी पत्रकार परिषद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
25 Dec 2024, 06:41 वाजता
नागपुरमध्ये आज फडणवीस, भाजपा आमदारांचा सत्कार सोहळा
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदारांचा सत्कार सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर हा सत्कार सोहळा होणार आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जयंतीच औचित्य साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडेल.
25 Dec 2024, 06:41 वाजता
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे. आंबेडकर वादासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. एनडीएच्या घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधण्यावर चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे.
25 Dec 2024, 06:38 वाजता
बदलापूर पूर्व पोलिसांकडून 2 अट्टल चोरट्यांना बेड्या; 4 गुन्ह्यांची उकल
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या. दीपक उर्फ जोथा शैलेश झा आणि आकाश उर्फ राजू उर्फ बटल्या संतोष सिंग अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2, अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथे असा एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून 2 मोबाईल, 38 हजारांची रोखरक्कम आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
25 Dec 2024, 06:38 वाजता
रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले
नाताळच्या सणाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळतोय. गोव्यापाठोपाठ आता कोकणातील समुद्र किनार्यांनी पर्यटकांना भुरळ पाडलीय. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनार्यांवर गर्दी केलीय. इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टसचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांची सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरासेलींग, एटीव्ही राईड्स, जायंटबॉल सारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडीमंडळीही खुश आहे. राज्याच्या अनेक भागातून आलेले पर्यटक खास कोकण पदधतीच्या व्हेज ,नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेत आहेत. इथंल्या ताज्या मासळीच्या आस्वादानेही पर्यटकांच्या जीभेचे चोचले पुरवले जाताहेत. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. इथून पाय निघत नाही असं पर्यटक सांगतात.
25 Dec 2024, 06:30 वाजता
वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना सांताक्लॉज कडून चॉकलेट
नवी मुंबई पोलीस आयुक्त परिसरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांचं कौतुक करताना त्यांना सांताक्लॉजद्वारे चॉकलेट भेट देण्यात आले. नवी मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना नाताळच्या पार्श्वभूमीवर थेट सांताक्लॉज चॉकलेट देण्यासाठी अवतरला होता. यावेळी वाहनचालकांनी या उपाक्रमाचे स्वागत केले तर वाहतूक पोलीसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्व वाहनचालकांना केले आहे.
25 Dec 2024, 06:30 वाजता
खारघरमध्ये हायटेन्शन टॉवरवर चढला तरुण अन्...
खारघर येथील बेलपाडा येथे एक तरुण हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना घडली. हायटेन्शन टॉवरवर चढलेला व्यक्तीला नागरिकांनी आवाज देत खाली उतरण्यास भाग पाडले. तरुण खाली येताच एका सीआरपीएफ जवानाने पकडून तरुणाला पोलीसांच्या स्वाधीन केलं. या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
25 Dec 2024, 06:30 वाजता
बदलापूर स्थानकावर लाखो रुपये खर्च करुन बांधलेली 'ती' भिंत काही महिन्यांत तोडली
बदलापूर, वांगणी, कर्जत भागातून दररोज हजारो प्रवासी नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबईला ये-जा करत असतात. त्यामुळे लोकल वाहतुकीवर प्रचंड ताण येतोय. गेल्या 10 वर्षात या मार्गावर एकही नवीन लोकल वाढलेली नाही. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कल्याण-कर्जत मार्गावर तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकचे काम सुरू करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर कल्याण ते बदलापूर मार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम करत असताना रेल्वेनं गावदेवी भागात लाखो रुपये खर्चून बांधलेली संरक्षक भिंत तोडण्यास सुरुवात केलीय. मुळात तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकचे काम सुरू होणार हे माहीत असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत का बांधली? असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतोय.
25 Dec 2024, 06:27 वाजता
सगळे येऊन देवाभाऊंच्या...; गोपीचंद पडळकरांचं जाहीर भाषणात विधान
आपला नेता मुख्यमंत्री झाला यामध्ये आपण खुश आहोत. यापेक्षा सगळे येऊन देवाभाऊंच्या पाया पडतात यामध्ये आपण जास्त खुश आहे, असे विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी येथे सत्कार सोहळा प्रसंगी बोलत केलं आहे.
25 Dec 2024, 06:26 वाजता
राज्यातले सगळे मस्तवाल आता वळचणीला आलेत : पडळकर
राज्यातले सगळे मस्तवाल आता वळचणीला आले आहेत, अशा शब्दांमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. अधिवेशन झालं, पण कोणी विरोधक मोठ्याने बोलायला तयार नसल्याने ते तिकडे आहेत की आमच्याकडे आहेत,हे कळेना! काँग्रेसवाले तर प्रश्न पण उपस्थित करतात आणि उत्तर पण तेच देतात, त्यामुळे ते सगळे हवालदिल झाले आहेत. काहीच दम नाही विरोधकांमध्ये, असा टोला पडळकरांनी लगावला. विरोधक स्ट्राँग पाहिजे त्याशिवाय मजा येत नाही. पुढे कोणाचं स्ट्राँग दिसत नाही. एखादा मस्तवाल असला तर त्याच्या विरोधात लढायला मजा येते पण सगळे मस्तवाल आता वळचणीला आले आहेत, असे विधान आमदार पडळकरांनी केले आहे. ते सांगलीच्या आटपाडी येथे सत्कार सोहळ्यात बोलत होते.