Maharashtra Breaking News LIVE Updates: कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीला शेगावमधून अटक

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News LIVE Updates: कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीला शेगावमधून अटक

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज देशभरामध्ये नाताळ मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवसभरामध्ये राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या ताज्या घडामोडींवर अगदी संक्षिप्त स्वरुपात टाकलेली नजर एकाच क्लिकवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

25 Dec 2024, 11:29 वाजता

मुंबई BJP ची महत्त्वाची बैठक! मोठ्या निर्णयाची शक्यता

मुंबई भाजप कोअर कमिटीची आज दुपारी बैठक पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित राहणार असून शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने नव्या अध्यक्ष निवडीबाबतही चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

25 Dec 2024, 10:49 वाजता

उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत जाणार आहेत. पदभार स्वीकारल्यावर शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

25 Dec 2024, 09:27 वाजता

CM फडणवीसांचा 100 दिवसांचा Action Plan; लवकरच...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या अॅक्शन प्लानचा आढावा घेतला आहे. आता देवेंद्र फडणवीस प्रत्येक खातेनिहाय आढावा घेणार असून लवकरच अॅक्शन प्लान निश्चित केला जाणार आहे. यामध्ये कृषी, गृहनिर्माण, जलसंपदा आणि ऊर्जा विभागाचा सुरूवातीला आढावा घेण्यात आला आहे.

25 Dec 2024, 09:24 वाजता

'वन नेशन, वन इलेक्शन'च्या पहिल्या बैठकीची तारीख ठरली

'वन नेशन, वन इलेक्शन'ची पहिली संसदीय बैठक 8 जानेवारी 2025 रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 39 सदस्यीय संसदीय पॅनलची पहिली बैठक असणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या या प्रमुख निवडणूक सुधारणा उपक्रमावर देशव्यापी चर्चा सुरू होईल. संसदीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या विधेयकांवरील संयुक्त समितीची पहिली बैठक, भाजपचे सदस्य पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन विधेयकांबाबत अधिका-यांनी पॅनेलला माहिती देणारी प्रास्ताविक बैठक होण्याची शक्यता आहे. 

25 Dec 2024, 08:48 वाजता

वाइन उद्योगासाठी फडणवीस सरकारकडून 38 कोटी रुपये

राज्यातील वाइन उद्योगाला प्रोत्साहन योजनेअंतर्गत तब्बल 38 कोटी रुपयांचा निधी देण्याचा शासन निर्णय मंगळवारी उद्योग विभागाने जाहीर केला आहे. उद्योग विभागाने केलेल्या विनंतीनुसार वित्त विभागामार्फत वाइन उद्योग प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकूण 21 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यानुसार हा सर्व निधी बीडीएस प्रणालीवर वितरणाकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात नाशिक आणि सोलापूर येथील कंपन्यांचा समावेश आहे.

25 Dec 2024, 08:02 वाजता

दुसरे विश्व मराठी संमेलन पुण्यात; तारखांचाही घोषणा

दुसरे विश्व मराठी संमेलन पुण्यात फेब्रुवारी अखेर होणार आहे. राज्य सरकारतर्फे दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. याची घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केलीय. तर या संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही दिले आहेत. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत यांनी घोषणा केली आहे.

25 Dec 2024, 07:58 वाजता

3 पुणेकरांचा जीव घेणाऱ्या 'त्या' डंपर चालकाला अटक

पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालकाला ही पोलिसांनी अटक केली आहे. डंपरवरील चालक मद्यप्राशन करत असल्याची माहिती असून ही डंपर का चालवायला दिला. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून डंपर मालकाल अनिल काटे याला ही अटक करण्यात आली आहे. तर डंपर चालक गजानन शंकर तोटरे त्याला न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या डंपरने 9 जणांना चिरडलं होतं. त्यापैकी तिघांचा मृत्यू झालेला. 

25 Dec 2024, 07:56 वाजता

ख्रिसमस, थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलीस सज्ज; पहाटे पाचपर्यंत बार सुरु राहणार असल्याने विशेष खबरदारी

24, 25 आणि 31 डिसेंबरला गृह विभागाने पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच या तिन्ही दिवशी नागरिक जल्लोष करण्याच्या मूडमध्ये असल्याने याचा समाजकंटकांकडून कुठलाही गैरफायदा उचलला जाऊ नये याकरिता मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी मंगळवार रात्रीपासून शहरात कोम्बिंग ऑपरेशन, हॉटेल-लॉजिंगची तपासणी आणि नाकाबंदीवर जोर दिला आहे. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेलबरोबरच समुद्रकिनाऱ्यांवरदेखील पाट्यांचे आयोजन केले जाते. शिवाय मोठ्या संख्येने नागरिक चौपाट्यांवरदेखील जातात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरदेखील तगडी गस्त ठेवण्यात येणार आहे.

25 Dec 2024, 07:42 वाजता

केंद्र सरकारने रातोरात 5 राज्यांचे राज्यपाल बदलले 

माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल नियुक्त करण्यात आलं आहे. आरिफ खान हे केरळचे राज्यपाल होते. त्यांच्या जागी बिहारचे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. हरि बाबू कंभमपती यांची ओडिशाच्या  राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. विजय कुमार सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.

25 Dec 2024, 07:39 वाजता

मध्य रेल्वे आज संडे टाइम टेबलप्रमाणे धावणार; ख्रिसमसच्या सुट्टीमुळे प्रशासनाचा निर्णय

मध्य रेल्वेवर बुधवारी ख्रिसमसच्या सुट्टीमुळे रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना घराबाहेर पडताना टाइम टेबल बघूनच बाहेर पडावे लागणार आहे. मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मंगळवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी याबाबत माहिती देण्यात आली.