Breaking News Live Updates :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच राज्याला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आली.   

Breaking News Live Updates :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : मराष्ट्राला हादरवुन टाकणारा घोटाळा नुकताच समोर आला असून, महाराष्ट्राची तिजोरी लुटणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज कसे महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारतायत याचा INVESTIGATION रिपोर्ट समोर. 

जळगाव आणि अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतायत. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणा-या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे.

3 Jul 2024, 23:48 वाजता

मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल खोळंबल्या. यामुळे  लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

 

3 Jul 2024, 21:26 वाजता

प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

 

3 Jul 2024, 20:13 वाजता

पुण्यात भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आले आमने-सामने

भाजपच्या कार्यकर्त्यांना जोशी वडेवाले समोर ( काँग्रेस भवन पासून दीडशे ते दोनशे मीटर वर)  रोखण्यात आलं. एकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात असताना काही कार्यकर्ते गनिमी कावा करत काँग्रेस भवन समोर पोहोचले. त्यांनी जय श्रीराम जय घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना हूसकावून लावलं. प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील कंपाउंड जवळ आले आणि त्यांनी भाजप विरोधात घोषणा दिल्या.

3 Jul 2024, 19:33 वाजता

भुशी धरण धबधब्यात कुटुंब वाहून गेल्यानंतर अजित पवारांचे सुरक्षेसाठी आदेश

लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यात, पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावणं, कुंपण घालणं, सुरक्षिततेसाठी जाळ्या लावणं यांसह अन्य आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देश आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले, याविषयीची माहिती आज विधानसभेत दिली.

3 Jul 2024, 18:16 वाजता

लोकसभेचं अपयश झाकण्यासाठी योजनांची घोषणा; ठाकरेंच्या आमदाराचा हल्लाबोल

आमदार सुनील प्रभू यांनी विधानपरिषदेमध्ये अर्थसंकल्पासंदर्भातील चर्चेदरम्यान, "आज अर्थसंकल्पावर कालपासून चर्चा सुरू आहे. सरकारने अर्थसंकल्प चुकीचा आहे.‌ राज्यावर कर्जाचा बोजा आहे.‌ लोकसभेनंतर आलेला अपयश विकण्यासाठी आणि लोकांना भुलवण्यासाठी या सर्व योजना जाहीर केल्या आहेत," अशी टीका केली. तसेच पुढे बोलताना, "या योजनेचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केलं. मात्र त्याचे अंमलबजावणी होणार आहे का?" असा सवालही सुनील प्रभूंनी उपस्थित केला आहे. "लाडकी बहीण योजनेसाठी मनपा तहसील कार्यालयात झुंबड उडते. मात्र नियोजन नाही. अधिकारी नागरिकांची व्यवस्थित बोलत नाहीत‌. ही योजना सरकारची आहे. मात्र पक्षाच्या खाजगी कार्यालयातून त्याची काम सुरू आहेत," असंही प्रभू म्हणाले. 

3 Jul 2024, 17:38 वाजता

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पुण्यातील भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस शहराध्यक्षांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या जीविताविषयी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील काँग्रेस भवनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 

3 Jul 2024, 16:37 वाजता

वैनगंगा-पैनगंगा जोडणार! 9 नवीन धरणांचं बांधकाम सुरु; फडणवीसांनी दिली माहिती

121 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिभाषणावरील चर्चेला विधानपरिषदेत दिली आहे. वैनगंगा-नलगंगा नदीजोड प्रकल्प करणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं आहे. नार पार गिरणा कोकणातील महत्त्वाचा प्रकल्प आहे, असंही फडणवीस म्हणाले. तसेच राज्यात नवीन 9 धरणं तयार करत आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

3 Jul 2024, 16:24 वाजता

मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टातून मोठी बातमी! कोर्टाचे मगासवर्ग आयोगाला निर्देश

मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे. मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून निर्माण झालेला पेच सुटला आहे. कालच्या सुनावणीत विरोध केलेल्या याचिकाकर्त्यांनी आयोगाला याचिकेत प्रतिवादी करण्यास तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये खंड पडण्याची भीती अखेर टळली आहे. मागासवर्ग आयोगाला न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. 10 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. 

3 Jul 2024, 15:37 वाजता

दानवेंबद्दलचा निर्णय उद्या होण्याची शक्यता

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावर फेरविचार करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय उद्या म्हणजेच 4 जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 Jul 2024, 15:15 वाजता

मुख्यमंत्र्यांच्या रिमार्कला काही किंमत आहे की नाही?

मंत्रालय अधिकाऱ्यांच्या कामकाजातील दिरंगाईवरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांचे सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रिमार्क देऊनही फाईल पुढे जात नाही, मग मुख्यमंत्र्यांच्या रिमार्कला काही किंमत आहे का नाही? सात दिवसांच्या वर फाईल निकाली काढली नाही तर किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली? मंत्री उत्तरं का देत नाहीत? असे प्रश्न बच्चू कडुंनी उपस्थित केले आहेत.