Breaking News Live Updates :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच राज्याला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आली.   

Breaking News Live Updates :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : मराष्ट्राला हादरवुन टाकणारा घोटाळा नुकताच समोर आला असून, महाराष्ट्राची तिजोरी लुटणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज कसे महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारतायत याचा INVESTIGATION रिपोर्ट समोर. 

जळगाव आणि अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतायत. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणा-या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे.

3 Jul 2024, 14:15 वाजता

दानवेंना दिलासा मिळणार? 3 वाजता जाहीर करणार निर्णय

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंच्या निलंबनाचा फेरविचार होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून दुपारी 3 वाजता निलम गोऱ्हे आपला निकाल जाहीर करणार आहे. सध्याच्या निर्णयानुसार दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. आता हा कालावधी शिथिल केला जाईल अशी शक्यता आहे.

3 Jul 2024, 14:13 वाजता

मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी तातडीची बैठक

अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठक बोलावली आहे. मुंबईमध्ये कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने शुक्रवारी तातडीची बैठक होणार आहे. मुंबईचे आमदार, महापालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांच्यासोबत विधान भवनात राहुल नार्वेकर बैठक घेणार आहेत. आमदार आशिष शेलार यांनी पाणी समस्येसंदर्भात राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारी सोबतच उद्धव ठाकरे गटाने वांद्रे विधानसभा क्षेत्रात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी पायलट प्रकल्प राबवला होता जो अयशस्वी ठरला याबद्दलही माहिती दिली.

3 Jul 2024, 14:11 वाजता

दानेवेंना दिलासा मिळण्याची शक्यता

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा फेरविचार सुरु आहे. यासंदर्भात सर्व गटनेत्यांची नीलम गो-हे यांच्या दालनात बैठक सुरु आहे. अंबादास दानवे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. दानवे यांनी उपसभापतींना दिलगीरी व्यक्त करणारं पत्र पाठवलं आहे.  शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचे प्रश्न मांडण्यासाठी निलंबनाचा फेरविचार करण्यात यावा अशी विनंती दानवेंनी केली आहे. त्यामुळे पाच दिवसांच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे.

 

3 Jul 2024, 12:45 वाजता

Breaking News Live Updates : अंबादास दानवे यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. विधानभवनात आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच्याच विरोधात आज अंबादास दानवे समर्थकांनी अंबादास दानवे यांच्या निवासस्थानाबाहेर राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा दिल्या. त्यामुळे इथे अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले आहे.

3 Jul 2024, 12:41 वाजता

Breaking News Live Updates : देशाच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला निवडून दिलंय. 60 वर्षांनंतर असं झालयं की, एखाद्या पक्षाचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही घटना म्हणजे एक असामान्य घटना असल्याचं पंतप्रधान मोंदींनी म्हटलं आहे.

3 Jul 2024, 12:32 वाजता

Breaking News Live Updates : निलंबनाची कारवाई झालेले अंबादास दानवे म्हणतात, माझ्या सर्वोच्च नेत्यांनी...

विधानपरिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. ज्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना 'निलंबन एकांगी झालंय. माझ्या सर्वोच्च नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय', असं म्हणत प्रतिक्रिया दिली. 'उद्धव‌ ठाकरे यांना नकली संतान म्हणणं हा महिलेचा अपमान नाही का? सभापती सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल‌ं बनतंय. प्रवीण दरेकर म्हणाले हातात बांगड्या घातल्या.... हा काय महिलेचा आपमान‌‌ नाही का? आता जनतेचे प्रश्न‌ सोडवण्यासाठी मी पक्ष कार्यालयात बसलोय' या शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. 

3 Jul 2024, 11:41 वाजता

Breaking News Live Updates : राहुल गांधी यांना बाल बुद्धीचा नेता म्हणणं हा लोकशाहीचा अपमान- संजय राऊत

खासदास संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बाल बुद्धीचा नेता म्हणणं हा लोकशाहीचा अपमान असल्याचं राऊत म्हणाले.  महायुतीमध्ये कोणीही वाघ नाही तर लांडगे आणि कोल्हे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

3 Jul 2024, 11:19 वाजता

Breaking News Live Updates : विधान परिषदेत विरोधकांचा बहिष्कार

विधान परिषदेत विरोधकांचा बहिष्कार. अंबादास दानवे यांच्या निलंबना नंतर काल टाकला होता कामकाजावर बहिष्कार. आज ही विरोधी पक्षाचे आमदार परिषदेत आद्यप आले नाहीत. सकाळी साडे दहा वाजल्या पासून परिषदेचे कामकाज सुरु. 

3 Jul 2024, 10:55 वाजता

Breaking News Live Updates : बहिण लाडकी योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची तारांबळ

बहिण लाडकी योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी महिला आणि नागरिकांनी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणीं मोठी गर्दी करत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर देखील सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. योजनेसाठी लागणारा जन्म दाखला आणि इतर कागदपत्र मिळावेत यासाठी रांगेत उभारून नागरिक कागदपत्र घेत आहेत.. महानगरपालिकेत असणाऱ्या नागरी सेवा केंद्रात जन्म मृत्यू दाखला मिळवण्यासाठी लोकांची नेहमी गर्दी असते त्यात बहिण लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी आणखी झुंबड वाढली आहे. त्यामुळे सेवा केंद्रात कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

3 Jul 2024, 10:21 वाजता

Breaking News Live Updates : सेन्सेक्स प्रथमच 80,000 च्या वर... 

सेन्सेक्स प्रथमच 80,000 च्या वर गेला, निफ्टी आयुष्यभराच्या उच्चांकावर गेल्यानं शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ऐतिहासिक 80,000 चा टप्पा गाठला तर निफ्टीनेही आयुष्यभरातील उच्चांक गाठला. 
NSE निफ्टी 50 0.7% वाढून 24,291.75 अंकांवर होता, तर S&P BSE सेन्सेक्स 0.72% वाढून 80,013.77 अंकांवर पोहोचला. 30 समभागांच्या सेन्सेक्सने 80,000 चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. निफ्टी 50 निर्देशांक 169 अंकांनी वाढला आणि 24,292 वर त्याचा ताजा उच्चांक नोंदवला.