Breaking News Live Updates :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच राज्याला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आली.   

Breaking News Live Updates :मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडे; कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक लोकल जागेवर थांबल्या, लाखो प्रवासी खोळंबले

Breaking News Live Updates : मराष्ट्राला हादरवुन टाकणारा घोटाळा नुकताच समोर आला असून, महाराष्ट्राची तिजोरी लुटणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज कसे महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारतायत याचा INVESTIGATION रिपोर्ट समोर. 

जळगाव आणि अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी आहे. सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण होतायत. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणा-या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे.

3 Jul 2024, 09:33 वाजता

Breaking News Live Updates : गुप्तधनासाठी कोल्हापूरात नरबळी 

गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कौलव गावातल्या एका घरामध्ये तीन फूट खड्डा खणला असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

3 Jul 2024, 09:09 वाजता

Breaking News Live Updates : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ 

हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आलीय. ब्रम्हपुरीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांना तडे गेलेयत. तर खोल्यांना गळती लागलीय. त्यामुळे पाचवी पर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांना गळक्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागतायत. या शाळेत 70 विद्यार्थी शिक्षण घेतायेत. मात्र, दोनच वर्ग खोल्या असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय. गावक-यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्याध्यापकांचे कार्यालय तात्पुरतं मोकळे करून विद्यार्थ्यांना तीन खोल्या उपलब्ध करून दिल्यायत. मात्र, खोल्या गळत असल्याने पाण्यासाठी भांडी लावण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलीय. त्यामुळे मंत्रिमहोदय यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 

3 Jul 2024, 08:47 वाजता

Breaking News Live Updates : गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मृत साप 

 

सांगलीच्या पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

3 Jul 2024, 08:14 वाजता

Breaking News Live Updates : माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या कुठवर पोहोचल्या? 

दिवे घाटाची अवघड टप्पा पार करुन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल झालीये.  लाखो वारक-यांचं सासवड मध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. आज दिवसभर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम असेल. तर, तिथं लोणी काळभोरकरांचा पाहुणचार घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरची वाट धरली आहे. 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोष करीत संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झालीये.

3 Jul 2024, 08:13 वाजता

Breaking News Live Updates : भावना गवळी,कुपाल तुमाने यांच पुनर्वसन, हेमंत पाटलांच काय?

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सत्तांतरावेळी उद्धव ठाकरे ऐवजी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली. मतदार संघात चेहरा बनलेल्या हेमंत पाटलांना हिंगोली लोकसभेतून जाहीर झालेली उमेदवारी मित्र पक्ष भाजपच्या दबावामुळे सोडावी लागली, हेमंत पाटलांऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशीम मधून लोकसभेच्या मैदानात उतरवलं, पक्षाचा हुकूम सरआखों पर म्हणत राजश्री पाटील तेथून लढल्या,पण त्यांचा तेथून पराजय झाला, भाजपच्या दबावामुळे हक्काचा मतदारसंघ हेमंत पाटलांनी सोडला, आता 11 जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत, यात कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना विधानसभेची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून देत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय, पण पक्ष हुकूम मानणाऱ्या हेमंत पाटलांच पुनर्वसन होणार की नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 

3 Jul 2024, 07:16 वाजता

Breaking News Live Updates : नीट पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर.... 

नीट पेपरफुटी प्रकरणी मागील 10 दिवसांपासून लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींनी 'नीट' सह अन्य परीक्षांमध्येही हेराफेरी केल्याचाही CBI ला संशय असल्याची माहिती आता समोर आली. यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे धागेदोरे CBI ला मिळाले आहेत. या दोघांच्या मोबाइलमधून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांकडे संशयाची सुई वळली आहे. यात शहरातील बार्शी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ तोडकर व डोंगरे या व्यक्तींसोबत आरोपींचा सौदा झाल्याचे समोर आले आहे. तसेच तोडकर व आरोपी जाधव यांच्यातील चॅटिंगवरून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यात, तोडकर याने काही प्रवेश पत्र जाधव याच्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेली आहेत.

3 Jul 2024, 07:07 वाजता

Breaking News Live Updates : कुठल्याही परिस्थीती विधान परिषदेत महायुतीच्या 9 जागा आणायच्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेली आमदारांची बैठक संपलीय. कुठल्याही परिस्थीती विधान परिषदेत महायुतीच्या 9 जागा आणायच्या आहेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आमदारांना केल्या. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनंही कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना केल्यात. मतदारसंघ सांभाळा आणि लाडकी बहीणसारख्या सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचवा असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिले. 

3 Jul 2024, 07:06 वाजता

Breaking News Live Updates : विधानपरिषद निवडणुकीत मविआतील तीनही उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम 

विधानपरिषद निवडणुकीत मविआतील तीनही उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कुणीही उमेदवारी मागे घेणार नसल्याचा निर्णय बैठकीत झालाय. 3 उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव मविआकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

3 Jul 2024, 07:03 वाजता

Breaking News Live Updates : भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी कधी होणार? सुषमा अंधारे यांचा सवाल 

शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिक्षण घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याबाबत झी २४ तासचे आभार मानले . शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आठवडाभरात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. मात्र यावरच सुषमा अंधारेंनी शिक्षणमंत्र्यांना सवाल विचारलाय. भ्रष्ट अधिका-यांच्या करोडोंच्या संपत्तीची आणि या अधिका-यांची चौकशी कधी होणार असा सवाल सुषमा अंधारेंनी मंत्री दीपक केसरकरांना केलाय..