Breaking News Live Updates: पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Breaking News Live Updates : राज्यात पावसानं जोर धरलेला असतानाच इतरही घडामोडी नागरिकांचं लक्ष वेधत आहेक. राज्यात नेमकं काय सुरुय? पाहा...   

Breaking News Live Updates: पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Breaking News Live Updates : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

इथं पावसाचा जोर वाढत असतानाच तिथं राज्याच्या राजकीय वर्तुळामध्येही बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. देश पातळीवर घडणाऱ्या प्रत्येकत लहानमोठ्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा घ्या एका क्लिकवर.... 

19 Jul 2024, 14:08 वाजता

इंग्लडंहून आणलेल्या शिवकालीन वाघनखांच उद्घाटन
साताऱ्यात शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रम

19 Jul 2024, 13:39 वाजता

चंद्रपूरहून ताडोबाला जाणाऱ्या मार्गावर नाल्याला पूर आल्याने मार्ग ठप्प, विद्यार्थ्यांची अडचण

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा मार्गावरील मोरघट नाल्याला पूर आल्यामुळे चंद्रपूरहून ताडोबाला जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे पर्यटक व या मार्गावरुन शाळेला ये जा जाणारे विद्यार्थी अडकले. रात्री आलेल्या पावसाने हा नाला दुथडी भरून वाहू लागला. पहाटेपासूनच हा मार्ग पूर्णतः बंद झाला. पर्यटक पर्यायी मार्गाने ताडोबाला रवाना झाले. तर विद्यार्थ्यांना नाईलाजाने घरी परतावे लागले

19 Jul 2024, 12:59 वाजता

- मुंबई एअरपोर्टवर प्रवाशांचा खोळंबा
- तांत्रिक बिघाडामुळे चेक इन करण्यास अडचण
- बुकिंग एयर फ्लाइट आपरेशन प्रणालीवर परिणाम
- मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर ठप्प, प्रवाशांचा खोळंबा 

19 Jul 2024, 12:12 वाजता

Breaking News Live Updates : मोठी बातमी, विशाळगडावरून 

मोठी बातमी विशाळगडाहून. विशाळगडावरील कारवाईला स्थगिती देत भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला हा सवाल केला आहे. 

19 Jul 2024, 11:38 वाजता

Breaking News Live Updates : सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटीचा अपघात

सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटीचा अपघात. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ झाला एसटीला अपघात झाल्याची माहिती. एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले. कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं. 

19 Jul 2024, 11:06 वाजता

Breaking News Live Updates : आज काँग्रेस आखणार विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती 

काँग्रेस प्रदेशच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगांने चर्चा होणार आणि रणनिती आखली जाणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे त्या 7 आमदारांवर काय कारवाई  करायची या संदर्भात चर्चा होणार असून, आजच कारवाई न होता मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली जाणार असल्याचं कळत आहे. 

19 Jul 2024, 10:44 वाजता

Breaking News Live Updates : एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते...; असं कोणाला म्हणाले राऊत? 

एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरून देवाने जन्माला घातलं अशा प्रकारे लोकांना भयमित करत आहे एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेंचा युद्ध मिस थांबवला पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबू शकत नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केलेल्या परखड वक्तव्यानं साऱ्यांच्या नजरा वळवल्या. 

19 Jul 2024, 10:42 वाजता

Breaking News Live Updates : गँगस्टर अबू सालेमला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवलं 

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात गँगस्टर अबू सालेमला हलवण्यात आलंय. अबू सालेमचा तळोजा तुरुंगातील कारावास हा असुरक्षित असल्यामुळे नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याला हलवण्यात आलंय. ATS आणि SRPF यांच्या ताफ्यात अतिशय गोपनीय पद्धतीने सालेमला नाशिक कारागृहात आणण्यात आलंय.

19 Jul 2024, 10:28 वाजता

Breaking News Live Updates : पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना जवाब नोंदीसाठी दुसरी नोटीस

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पुणे पोलिसांनी दुस-यांदा नोटीस बजावलीय. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केला होता. वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली होती. याच चौकशीसाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांनी बजावलीय.

 

19 Jul 2024, 10:07 वाजता

Breaking News Live Updates : सिंधुदुर्गात गड नदिने ओलांडली इशारा पातळी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सायंकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. गडनदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आल्याने आचरा मार्गांवरील वाहतूक बंद झालीय. त्यासोबत वेंगुर्ला येथील होडावडा मार्ग दुसऱ्या दिवशी बंद झालाय. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.