करीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई

करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 15, 2024, 12:57 PM IST
करीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई title=

Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 13 सप्टेंबर रोजी हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामधील करीना कपूरच्या अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मात्र, करीनाचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करताना दिसत नाहीये. दरम्यान, करीना कपूरने शाहरुख खानच्या एका चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 422 कोटींची कमाई केली होती. 

शाहरुख खानच्या त्या चित्रपटाचे नाव 'चेन्नई एक्सप्रेस' आहे. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. रोहित शेट्टी या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. या ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसली होती. मीनम्मा नावाची भूमिका तिने या चित्रपटात साकारली होती. पण या भूमिकेसाठी ती पहिली पसंत नव्हती, तर करीना कपूरला पहिल्यांदा ऑफर करण्यात आली होती. मात्र, जेव्हा करीनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला त्यानंतर दीपिकाला साइन करण्यात आले. 

करीना कपूरने चित्रपट का नाकारला? 

 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटामध्ये काम करण्यास अभिनेत्री करीना कपूरने नकार दिला होता. कारण ती दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होती. तिने स्वत: याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, रोहित शेट्टीच्या या चित्रपटात काम करावे अशी करीनाची इच्छा होती. मात्र, त्यावेळी ती आमिर खानसोबत 'तलाश' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यामुळे व्यस्त असल्यामुळे तिने रोहितची ऑफर नाकारावी लागली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'तलाश' हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट होता. जो 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 175 कोटींची कमाई केली होती. वर्षभरानंतर प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्सप्रेस'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 422 कोटींची कमाई केली होती.