Breaking News Live Updates: पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Breaking News Live Updates : राज्यात पावसानं जोर धरलेला असतानाच इतरही घडामोडी नागरिकांचं लक्ष वेधत आहेक. राज्यात नेमकं काय सुरुय? पाहा...   

Breaking News Live Updates: पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Breaking News Live Updates : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

इथं पावसाचा जोर वाढत असतानाच तिथं राज्याच्या राजकीय वर्तुळामध्येही बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. देश पातळीवर घडणाऱ्या प्रत्येकत लहानमोठ्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा घ्या एका क्लिकवर.... 

19 Jul 2024, 10:05 वाजता

Breaking News Live Updates : मावळ मधील कुंडमळा पर्यटन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात

मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने कुंडमळा या धबधब्यावरील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती..त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांना येथे पर्यटन न करण्याचा सूचना फलक लावण्यात आला होता, लोणावळ्याच्या दुर्घटनेनंतर पर्यटकांनी अजूनही बोध घेतला नाही मात्र तरीही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत होतं.. परंतु आत्ता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, आंबी एमआयडीसी पोलिसांनी आता थेट जिथं धोकादायक पर्यटन करण्यात येत तिथेच थेट सुरक्षित पट्ट्या बांधण्यात आल्या असून.. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील तळेगांव दाभाडे पोलीस आणि आंबी एमआयडीसी पोलीस येथे पहारा देत आहे..सर्व कुंडमळा परिसरावर पोलिसांची तीक्ष्ण नजर असून, धोक्याचा इशारा असलेला फलक ही येथे लावण्यात आला.

19 Jul 2024, 09:44 वाजता

Breaking News Live Updates : पुण्यात झिकाचा धोका वाढला

पुणे शहरात गुरुवारी आणखी तीन रुग्णांना झिकाची लागण झाली असून, झिकाच्या एकूण रुग्णांची संख्या 27 वर पोहोचला आहे. कर्वेनगरमधील ३३ वर्षीय गर्भवती महिला, कोथरूडमधील 78 वर्षीय पुरुष आणि औंधमधील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. पुणेकरांच्या घरातच आढळत आहेत डासांची अंडी. अनेक परिसरात फवारणी सुरु मात्र नागरिकांनी परिसरत स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. 

19 Jul 2024, 09:42 वाजता

Breaking News Live Updates : पवारांचा अकोले दौराच गद्दारांचा नव्हे तर निष्ठावंतांचा तालुका, फ्लेक्स बाजीने वेधले सर्वांचे लक्ष

ज्येष्ठ नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका दौऱ्यावर येत आहेत. मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर किरण लहामटे यांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीनंतर आणि राष्ट्रवादीच्या फुटी नंतर प्रथमच शरद पवार अकोलेत येत असल्याने त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील मुख्य असलेल्या महात्मा फुले चौकात त्यांच आगमन होणार आहे आणि या चौकात लागलेल्या फ्लेक्सन सर्वांचं लक्ष वेधल आहे. मधुकर पिचड यांचा प्रवेश होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी लागलेले फ्लेक्स हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. गद्दारांचा नव्हे तर निष्ठावंतांचा तालुका अशा आशयाचे फ्लेक्सबाजी केल्यानं भांगरे समर्थकांनी गद्दारांना स्थान देऊ नये असा संदेश यातून देण्यात आला आहे. 

19 Jul 2024, 09:27 वाजता

Breaking News Live Updates : अंधेरी सबवेमध्ये पाणी... 

मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर जास्त दिसतो त्यामुळे पश्चिम उपनगरातल्या अंधेरी येथील सभेमध्ये पाणी भरला आहे त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी हे वाहतूक बंद केली असून गोखले पुलावरून वाहनांना जाण्यास सांगण्यात येत आहे. 

19 Jul 2024, 09:13 वाजता

Breaking News Live Updates : मुलुंड टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी 

सतत पडणार पाऊस, सिंग्णल यंत्रणेतील बिघाड ,खड्डे आणि टोल नाक्यामुळे मुलुंड टोल नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. इथं सध्या साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, त्यामुळं चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत. 

19 Jul 2024, 09:10 वाजता

Breaking News Live Updates : भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांच्या तक्रारींचा पाढा.... 

भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या तक्रारींचा पाढा. भाजपच्या बैठकीत काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती. 
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाल्या नसल्याच्या भाजपच्या काही नेत्यांच्या तक्रारी. 

19 Jul 2024, 09:08 वाजता

Breaking News Live Updates : मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी 

रायगड - खासदार सुनील तटकरे आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. खारपाडा टोलनाका ते लोणेरे पर्यंत हा दौरा असेल, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे.

19 Jul 2024, 08:56 वाजता

Breaking News Live Updates : रेल्वे सेवांवर पावसाचा परिणाम

मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळं पश्चिम मध्य आणि हार्बर लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. रस्ते वाहतूक सुरळीत असून शहरात पुढचे काही तास जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

19 Jul 2024, 08:18 वाजता

Breaking News Live Updates : मध्य रेल्वेवर शनिवारी मेगा ब्लॉक 

मध्य रेल्वेवर शनिवारी म्हणजेच उद्या रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.. मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या रात्री 12.30 ते रविवार पहाटे 4.30 पर्यंत हा ब्लॉक असेल.

 

19 Jul 2024, 08:16 वाजता

Breaking News Live Updates : महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात 

इंग्लंडवरून आणलेली वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. साताऱ्यात शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमही होणार.