Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांनी घड्याळ चिन्ह वापरुन...; शरद पवारांचा सुप्रीम कोर्टात दावा

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रामधील निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर घडामोडींचे लाइव्ह अपेड्स आपण या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवारांनी घड्याळ चिन्ह वापरुन...; शरद पवारांचा सुप्रीम कोर्टात दावा

Breaking News LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असून राजकीय घडामोडींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबरोबर मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यासंदर्भात उत्सुकता कायम आहे. राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.

26 Nov 2024, 07:11 वाजता

सोमवारी रात्री फडणवीसांचा दिल्लीत धावता दौरा; रात्रीच मुंबईत परतले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. मात्र "राज्याच्या राजकारणा संदर्भात दिल्लीत आज कोणतीही बैठक नाही," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे. "लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलोय आज रात्री माझी कुणाशीही बैठक नाही," असं फडणवीसांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस रात्रीच पुन्हा मुंबईला परतले. आज दिल्लीत महायुतीची बैठक होणार की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. 

26 Nov 2024, 07:08 वाजता

घरबसल्याच मिळवता येणार आवडती नंबर प्लेट

लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद करता येणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ह्यव्हीआयपीह्ण वाहन क्रमांकांच्या किमतीत वाढ केल्याचे जाहीर केले.

26 Nov 2024, 07:08 वाजता

पुण्याचं तापमान 10.5 अंश सेल्सियसवर

थंडीचा जोर वाढत असल्याने पुणे शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. रात्री आणि दिवसाही वातावरण थंड असून, यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी 10.5 अंश सेल्सियस तापमान एनडीए येथे नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज आहे. हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने घट होत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे क्षेत्र आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळून उत्तरेकडे वाटचाल करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात आर्द्रता वाढू शकते. तसेच नोव्हेंबरअखेर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमध्ये वाढ होऊन रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते.

26 Nov 2024, 07:05 वाजता

26/11 च्या हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ठिकठिकाणी शहिदांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

26 Nov 2024, 07:05 वाजता

ऑक्टोबर महिन्यात जगातील 12 टक्के भूभागावर सरासरीपेक्षा जास्त तापमान

जागतिक पातळीवर गेल्या 175 वर्षांत यंदाचा ऑक्टोबर महिना दुसऱ्या क्रमाकांचा उष्ण महिना ठरला आहे. तर भारत आणि पाकिस्तान आणि दक्षिण अमेरिकेत यंदा ऑक्टोबर महिना आजवरचा सर्वांधिक उष्ण ठरला आहे. ऑक्टोबर महिन्यात जगातील 12 टक्के भूभागावर सरासरीपेक्षा जास्त तापमान होते, असे निरिक्षण अमेरिकेच्या नॅशनल ओशनिकॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) यांनी दिली आहे.

26 Nov 2024, 07:02 वाजता

शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थिती आज सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडणार आहे.

26 Nov 2024, 07:02 वाजता

सप्तश्रृंगगड घाट रस्ता आजपासून 9 जानेवरीपर्यंत बंद

सप्तश्रृंगगड घाट रस्ता आजपासून 9 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. सोमवार, बुधवार व गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 11.30 या काळात रस्ता बंद राहणार आहे.

26 Nov 2024, 06:25 वाजता

रश्मी शुक्ला पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक

संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृह विभागाकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता. निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांच्या सक्तीच्या रजेचा कार्यकाळ संपला आहे. रश्मी शुक्ला यांनी  पुन्हा पदभार स्वीकारावा असा आदेश गृह विभागाने काढला आहे.

26 Nov 2024, 06:25 वाजता

आज ठाकरेंच्या पराभूत उमेदवार 'मातोश्री'वर

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांची 'मातोश्री'वर आज बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 12.30 वाजता होणार आहे.