23 Aug 2024, 07:48 वाजता
बेस्टच्या कंत्राटी चालकांचे काम बंद आंदोलन मागे
बेस्ट उपक्रमाच्या देवनार आगारातील डागा एसएमटी – एटीपीएल भाडेतत्त्वावरील बस चालकांचा पुकारलेले काम बंद आंदोलन गुरुवारी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील बैठकीनंतर मागे घेण्यात आले. चालक हळूहळू कर्तव्यावर दाखल झाल्यानंतर विस्कळीत असलेली बस सेवा पूर्ववत झाली.
23 Aug 2024, 07:47 वाजता
गणेश आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा
गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल, यादृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मास्टिक पद्धतीने रस्ते दुरूस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे मास्टिकचा वापर करूनच रस्त्यांची दुरूस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.
23 Aug 2024, 07:43 वाजता
रात्री उशीरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. जवळपास एका तासाहून अधिक काळ ही बैठक चालली. बैठकीत 24 तारखेला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्यातील महिला व लहान मुलींवर होणारे अत्याचार, लाडकी बहीण योजनेबरोबरच सुरक्षित बहीण या विरोधकांच्या नरेटिव्हवरुन चर्चा झाली, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4