Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राबरोबरच देशभरातील राजकीय, समाजिक आणि दैनंदिन घडामोडींसंदर्भातील क्षणोक्षणाच्या लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

23 Aug 2024, 15:42 वाजता

घाटगेंच्या भेटीसाठी जयंत पाटील कागलमध्ये

समरजीत घाटगेंच्या भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापूरमध्ये दाखल. कोल्हापूर विमानतळावरून कागल कडे झाले रवाना. समरजित घाटगे यांची कागल मध्ये घेणार भेट.

23 Aug 2024, 14:51 वाजता

बदलापूर अत्याचार प्रकरण : 'त्या' शाळेविरुद्ध मोठी कारवाई

बदलापूर अत्याचार प्रकरण : माहिती दडवल्याप्रकरणी शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाच्या तपासासाठी शासनाने नेमलेल्या एसआयटीने गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 Aug 2024, 13:22 वाजता

48 तास दिले तर पोलीस...; राज ठाकरेचं विधान! बदलापूरचाही उल्लेख

48 तास दिले तर पोलीस मुंबई साफ करुन देतील असं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिलेल्या भाषणामध्ये बदलापूर प्रकरण आपल्याच पदाधिकाऱ्यांनी समोर आणल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या हातात एकदा सत्ता द्या कायद्याची भीती काय असते ते दाखवतो, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

23 Aug 2024, 12:28 वाजता

महाराष्ट्र बंद : उद्या लोकल ट्रेन, बस बंद ठेवायला हवी- उद्धव ठाकरे

लोकल आणि बस सेवा उद्या बंद ठेवायला हवी, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोध करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी दिली आहे. याच बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. 

23 Aug 2024, 12:23 वाजता

राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पथक बदलापूरमध्ये; पोलिसांची चौकशी करणार

दिल्लीहून राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पथक बदलापूरसाठी सकाळीच रवाना झालं आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे सचिव सदस्य रूपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार कातायानी आनंद बदलापूरला रवाना झालेत. बदलापूर बाल अत्याचार प्रकरणात पोलीस ठाणे, शाळा प्रशासन यांची चौकशी हे आयोग करणार आहे. आयोगाचे पदाधिकारी पीडितेच्या पालकांची भेट घेणार आहेत. आजच हे पथक बदलापूरला पोहचणार आहे.

23 Aug 2024, 11:25 वाजता

राज ठाकरेंनी रद्द केली यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द केली आहे. या बैठकीसाठी जिल्हाभरातून पदाधिकारी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत समारोहात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

23 Aug 2024, 11:22 वाजता

रविकांत तुपकर पत्नीसहीत पोलिसांच्या ताब्यात

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नीस आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रविकांत तुपकर यांनीच ही माहिती दिली आहे. आज रविकांत तुपकर यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार असं जाहीर करण्यात आलेलं. या आंदोलनापूर्वी पोलिसांनी कारवाई केली आहे.

23 Aug 2024, 09:54 वाजता

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन उद्धव विरुद्ध काँग्रेस?

महाविकास आघाडीत सध्यातरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती चर्चा नको, अशी भूमिका काँग्रेसने मांडली असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या किमान चार भिंतीआड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याच्या भुमिकेनंतर काँग्रेस नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेत्यांची ही भूमिका  उद्धव ठाकरे यांना मान्य होणार का? हे पहावं लागणार आहे.

23 Aug 2024, 09:50 वाजता

एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला

एमपीएससी संदर्भातील प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी एमपीएससी चे विद्यार्थी शरद पवार यांना भेटायला पोहोचले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ही भेट घडत आहे. 25 तारखेला तरी परीक्षा पुढे ढकलण्यासह संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवा विभागातील पदांचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात तीव्र आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं. मात्र काही बाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे. शिवाय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आणखी काही प्रश्न आहेत. त्यामुळे स्वतः शरद पवार यांनी या विषयात लक्ष घालण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात विद्यार्थी आले आहेत. रोहित पवार देखील त्यांच्यासोबत आहेत.

23 Aug 2024, 09:49 वाजता

संजय राऊतांच्या आज तीन सभा

खासदार संजय राऊत आज धरणगाव, अमळनेर आणि जळगावात सभा घेणार. आज संजय राऊत यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात संजय राऊत यांचा दौरा. ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.