Maharashtra Breaking News LIVE: आदित्य ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES... 

Maharashtra Breaking News LIVE:  आदित्य ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया राज्यातीस व देश विदेशातील लाइव्ह घडामोडी. 

20 Oct 2024, 13:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कोल्हापुरात मंदिर विहिरीत कोसळून पुजा-याचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगे गावात एक विचित्र अपघात झालाय.. दांगट मळा इथं नृसिंहाचं मंदिर थेट विहिरीत कोसळलंय.. या दुर्घटनेत मंदिरातील पुजा-याचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय.. कृष्णात उमराव दांगट असं या पुजा-याचं नाव आहे.. विहिरीच्या कडेलाच हे 20 वर्ष जुनं मंदिर होतं.. सकाळी पुजारी मंदिरात आले असता संपूर्ण मंदिरच विहिरीत कोसळलं.. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालीये. 

20 Oct 2024, 12:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विदर्भातील 12 जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

ठाकरे गटाने विदर्भातील 12 जागांवर दावा केला आहे. काल झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने ठाकरे गट नाराज असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. 

20 Oct 2024, 12:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मविआमधील धुसफुस कायम, बैठकीनंतरही जागावाटपावर तोडगा नाही

शिवसेना आणि काँग्रेसचे जागावाटपात जमेना. 10 तासांच्या बैठकीनंतरही जागावाटपावर तोडगा नाही. शिवसेना ठाकरे गटाने बोलावली तातडीची बैठक. मविआमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले नसल्याचे चित्र. 

20 Oct 2024, 11:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:   इंदापूर शहरात झाला हर्षवर्धन पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ इंदापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या इंद्रेश्वराला श्रीफळ वाढवून करण्यात आलााय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या अंकिता पाटील ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आलाय

20 Oct 2024, 11:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक

मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाच्या नेत्यांची बैठक. जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत होवू शकते चर्चा

20 Oct 2024, 10:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  काँग्रेस नेत्यांचा दिल्ली दौरा; बैठकीत उमेदवारांच्या नावांची चर्चा होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक समिती महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडे असलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा करणार आहे. आजच्या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या जवळपास सर्वच जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे.  

20 Oct 2024, 10:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती 

काल रात्री आलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदा घाटा परिसरात असलेले मंदिर हे पाण्याने वेढले गेलेले आहे. दोन दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

20 Oct 2024, 10:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  खंबाटकी घाटात वाहतूक ठप्प, अनेक वाहने बंद पडली

खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणारी वाहने घाटात अडकून पडली आहेत. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि साताऱ्याचा दिशेने वाहने निघाली असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली आहे. 

20 Oct 2024, 10:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यात भात शेतीचे मोठं नुकसान

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडा पडलेला परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत . जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडी खाली आहे . यातील 80 ते 90 टक्के शेतीचे या परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे . 

20 Oct 2024, 09:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक निवासस्थानी दाखल. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक. या आधी देखील अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती... त्यामुळे येत्या 2-3 दिवसांत माढा मतदारसंघात दादांना धक्का बसण्याची शक्यता.