Maharashtra Breaking News LIVE: बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES... 

Maharashtra Breaking News LIVE:  बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया राज्यातीस व देश विदेशातील लाइव्ह घडामोडी. 

20 Oct 2024, 11:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक

मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाच्या नेत्यांची बैठक. जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत होवू शकते चर्चा

20 Oct 2024, 10:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  काँग्रेस नेत्यांचा दिल्ली दौरा; बैठकीत उमेदवारांच्या नावांची चर्चा होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक समिती महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडे असलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा करणार आहे. आजच्या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या जवळपास सर्वच जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे.  

20 Oct 2024, 10:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती 

काल रात्री आलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदा घाटा परिसरात असलेले मंदिर हे पाण्याने वेढले गेलेले आहे. दोन दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

20 Oct 2024, 10:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  खंबाटकी घाटात वाहतूक ठप्प, अनेक वाहने बंद पडली

खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणारी वाहने घाटात अडकून पडली आहेत. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि साताऱ्याचा दिशेने वाहने निघाली असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली आहे. 

20 Oct 2024, 10:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यात भात शेतीचे मोठं नुकसान

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडा पडलेला परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत . जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडी खाली आहे . यातील 80 ते 90 टक्के शेतीचे या परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे . 

20 Oct 2024, 09:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक निवासस्थानी दाखल. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक. या आधी देखील अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती... त्यामुळे येत्या 2-3 दिवसांत माढा मतदारसंघात दादांना धक्का बसण्याची शक्यता.

20 Oct 2024, 09:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकेने साडेपाच हजार कर्मचारी देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार हे कर्मचारी दिले जाणार आहेत.

20 Oct 2024, 09:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: - सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात 

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात. जिल्ह्यातील चार ते पाच जागा लढवण्याचा दुसऱ्या आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचा निर्णय. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर तिसऱ्या आघाडीतून प्रहार जनशक्ती पक्षाचा दावा.

20 Oct 2024, 08:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई 

राज्य विधानसभा निवडणूक निवडणुकीची तारीख जाहीर होतात आचारसंहिता लागू झाली आहे या काळात गैर व्यवहार होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोग अलर्ट मोडवर आहे गेल्या चार दिवसात निवडणूक आयोगाच्या पथकाने बेहीशेबी १० कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम तसेच मद्य जप्त केले आहे.

20 Oct 2024, 08:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: गडचिरोली पोलिसांपुढे नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलिसांपुढे एका नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे यातील पुरुष हरियाणा राज्यातील रहिवासी आहे तर महिला मूळ गडचिरोली जिल्ह्यातील आहे. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आजवर एकुण 676 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे