India Squad for Australia Tour : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली असून बारच काळ संघाबाहेर असलेल्या ईशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईशानने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय ए संघात ईशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय ए संघ आणि ऑस्ट्रेलिया ए संघात मालिका खेळवली जाणार आहे.
ईशान किशानला संधी
ऑस्ट्रेलियाचा हा दौरा भारतीय ए संघातील काही खेळाडूंसाठी चांगली संधी ठरू शकतो. यापैकीच एक म्हणजे ईशान किशन. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानतंर ईशान किशनवर बीसीसीआय नाराज होतं. तेव्हापासून ईशान किशनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद आहेत. इतकंच नाही तर बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही ईशानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता भारीतय ए संघातून दमदार कामगिरी करत टीम इंडियात एन्ट्री करण्याची चांगली संधी आहे.
युवा खेळाडूंना संधी
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय ए संघात सलामीवीर अभिमन्यु ईश्वरन आणि साई सुदर्शन यांना संधी देण्यात आली आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाहीए. वैयक्तिक कारणाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतून रोहितने माघार घेतली आहे. या शिवाय भारतीय संघात देवदत्त पडिक्कल, बी इंद्रजीत आणि रिकी भुई यांनाही भारत ए संघात संधी देण्यात आली आहे. तर ईशान किशन आणि अभिषेक पोरेल हे विकेटकिपर म्हणून संघात असतील.
गोलंदाजीची धुरा खलील आणि यशवर
ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाजीची धुरा मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद आणि यश दयाल यांच्या खांद्यावर आहे. तर 21 वर्षीय नितीश रेड्डीने हार्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर बांगलादेशविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पदार्पण केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघातही नितीश रेड्डीचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नोव्हेंबरमध्ये भारत ए संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारतीय ए क्रिकेट सघ याच महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. 31 ऑक्टोबरला मेकॉयमध्ये आणि 7 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध चार दिवसांचे दोन सामने खेळणार आहे. यानंतर भारतीय क्रिकेट सँघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्या पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय ए संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार) अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, बी इंद्रजीत, अभीशेक पोराल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), मुकेश कुमार, रिकी भुई, नितीश रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, खलील अहमद, तनुष कोटियन आणि यश दयाल