Maharashtra Breaking News LIVE: मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक सुरु

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES... 

Maharashtra Breaking News LIVE:  मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक सुरु

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया राज्यातीस व देश विदेशातील लाइव्ह घडामोडी. 

20 Oct 2024, 09:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: - सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात 

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात. जिल्ह्यातील चार ते पाच जागा लढवण्याचा दुसऱ्या आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचा निर्णय. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर तिसऱ्या आघाडीतून प्रहार जनशक्ती पक्षाचा दावा.

20 Oct 2024, 08:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई 

राज्य विधानसभा निवडणूक निवडणुकीची तारीख जाहीर होतात आचारसंहिता लागू झाली आहे या काळात गैर व्यवहार होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोग अलर्ट मोडवर आहे गेल्या चार दिवसात निवडणूक आयोगाच्या पथकाने बेहीशेबी १० कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम तसेच मद्य जप्त केले आहे.

20 Oct 2024, 08:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: गडचिरोली पोलिसांपुढे नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलिसांपुढे एका नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे यातील पुरुष हरियाणा राज्यातील रहिवासी आहे तर महिला मूळ गडचिरोली जिल्ह्यातील आहे. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आजवर एकुण 676 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे

20 Oct 2024, 08:12 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लॉरेन्स बिष्णोईच्या नावे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकी

पुण्यात एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई  टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची  खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यवसायकाला ई मेल पाठवून धमकी देत खंडणी मागितली. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच नाव वापरत खंडणी मागण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पुणे गुन्हे शाखेकडे करण्यात आलीय. त्यानुसार पुणे सायबर पोलीसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

20 Oct 2024, 08:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: रामटेकच्या राखी तलाव चौकात भीषण अपघात, एकाचा मुत्यु

रामटेक तुमसर मार्गावर गोंदिया येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या अधिकाऱ्याची कार क्रमांक एमएच 31 एफआर 1115 ही गोंदियावरुन रामटेक दिशेने जात असताना रामटेक बायपास येथील राखी तलाव चौकामध्ये मोटरसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे कारवरील नियंञण सुटले.  कारने चौकालगत असलेल्या भेलपुरीच्या ठेल्याला धडक देत पुढे ती कार मोटार सायकल रिपेरिंग गॅरेज ला जाऊन आदळली. यामध्ये भेलपुरी ठेल्याजवळ उभे असलेले लखन शेखर भोसले वय ३५ वर्ष यांचा घटनास्थळी मुत्यू झाला.

20 Oct 2024, 07:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाः भावेश भिंडेला जामीन मंजूर

 

Maharashtra Breaking News LIVE: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक केलेला इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. भिंडेने यापूर्वी अटकेच्या कारवाईला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र त्याची अटक कायदेशीरच असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या अर्जावर न्यायाधीश व्ही. एम. पाठाडे यांनी निर्णय दिला. घाटकोपरमध्ये १३ मे रोजी होर्डिंग कोसळून १७ लोकांचा मृत्यू तर ८० हुन अधिक लोक जखमी झाले होते.