Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा

Maharashtra Breaking News LIVE:  राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा

30 Aug 2024, 12:38 वाजता

Vadhavan Port : वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांचं आंदोलन

पालघर येथील वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी काळे झेंडे फडकावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये दाखल होणार आहेत. मच्छीमार आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या बोटीत काळे फुगे लावलेले आहेत.या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलनं करण्यात आलेली होती. 

 

30 Aug 2024, 12:16 वाजता

MODI LIVE : 'जगात फिनटेकमध्ये भारत एक उदाहरण म्हणून पाहिलं जातं'

30 Aug 2024, 12:14 वाजता

MODI LIVE : 'मुद्रा लोन घेणाऱ्यांत 70 टक्के महिला आहेत'

30 Aug 2024, 12:13 वाजता

MODI LIVE : 'महिला सशक्तीकरणासाठी नव्या संधी आणल्या'

30 Aug 2024, 11:53 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  

 

30 Aug 2024, 11:04 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : वर्षा गायकवाड राहत्या घरी स्थानबद्ध; काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलंय. त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त असून कार्यकर्त्यांना भेटण्यास परवानगी नाही. शिवाय एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

 

30 Aug 2024, 10:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबई काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे.. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे.. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीये त्यामुळे वर्षा गायकवाड संतप्त झाल्यात

 

30 Aug 2024, 10:52 वाजता

PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत तणाव

मुंबईतील बीकेसी इथं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानिमित्त बीकेसीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतंर पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.

 

30 Aug 2024, 10:37 वाजता

PM Modi Maharashtra Tour : 'शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा', काँग्रेसचं मुंबईत आंदोलन

पंतप्रधानांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी मुंबईत तणावाचं वातावण निर्माण झालंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी काँग्रेनं पंतप्रधानांकडे केलीये. यासाठी मोदींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबईत ठिकठिकाणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी करणारे पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेत. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे पोस्टर्स लावलेत. दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक कार्यकर्त्यांना सकाळीच त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय.

 

30 Aug 2024, 09:57 वाजता

India Breaking News LIVE : कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारचं मोठं पाऊल

कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारचं मोठं पाऊल उचलंय. डॉक्टर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 7 दिवसात शिक्षा देण्यासंदर्भात ममता सरकार आणणार नवीन विधेयक आणलंय. नवीन विधेयकात 7 दिवसात फाशी देण्याची तरतूद करण्यात आलीय. 2 सप्टेंबरपासून पश्चिम बंगाल विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ममता बॅनर्जी 3 सप्टेंबरला हे विधेयक मांडणार आहे.