Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा

Maharashtra Breaking News LIVE:  राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा

30 Aug 2024, 09:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मालवणमधील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला अटक  

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटील याला अटक करण्यात आलीये. चेतन पाटील हा या पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणनच्या पथकाने मध्यरात्री त्याला अटक केली.

 

30 Aug 2024, 09:17 वाजता

PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, सभेसाठी पालघर सज्ज

पालघरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यक्रमास्थळी दाखल होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सभामंडपामध्ये बॅग, पिशवी, पाण्याची बॉटल, खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली. नागरिकांसाठी वाहने आणि बसेस वाहनतळ व्यवस्था करण्यात आली.

 

30 Aug 2024, 09:14 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचं अजब विधान

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजब विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही. आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात, असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीया वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

 

30 Aug 2024, 08:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का

या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. अंतापूरकर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप झाला होता. आमदार जितेश अंतापूरकर हे भाजप नेते अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण, बसवराज पाटील, अर्चना चाकूरकर यांच्या पाठोपाठ मराठवाड्यातील आणखी एका नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. 

 

30 Aug 2024, 08:30 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  महाराष्ट्र प्रदेश भाजपची आज महत्त्वाची बैठक 

आज महाराष्ट्र प्रदेश भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे..संघाच्या पुढाकारानंतर भाजपच्या हालचालींना वेग आलाय. या बैठकीत मुंबईतील उमेदवारांच्या संदर्भात निश्चिती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसेच राज्यातील विभागांचा आढावा आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांबाबत माहिती सुद्धा घेतली जाणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोअर कमिटीचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित राहणार आहे..

30 Aug 2024, 07:55 वाजता

PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत. सुमारे 76 हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे. समुद्रात खोल पाण्यातील बंदरांपैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणार असून, जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनासोबतच मोदी 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसंच ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील.