Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.
16 Sep 2024, 20:21 वाजता
लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान
मुंबईतील दरवर्षी हजारो भक्त गणेशोत्सवाच्या काळात लालबाग राजाच्या दर्शनाला येत असतात. सोबतच भरभरून दान सुद्धा करतात. यंदाही भक्तांनी लालबाग राजाच्या चरणी करोडोंचं दान दिलं असून दानपेटीत एकूण ५ कोटी ५ लाखांची रोकड जमा झाली आहे. तर ३८५७.६१० ग्रॅम सोनं आणि ५६ किलो ४६३ ग्रॅम चांदी गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. यात 1 किलो सोन्याच्या कॅटबरीचा ही समावेश आहे.
16 Sep 2024, 19:32 वाजता
धनगर समाज आरक्षणाच्या उपोषण स्थळी तरुणाने प्यायले विष
धनगर समाज आरक्षणाच्या उपोषण स्थळी आणखी एका तरुणाने विषारी औषध प्यायले आहे. या तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष प्यायलेल्या तरुणाची नाव संजय चौगुले, ईश्वर वठार अशी असून दोघेही पंढरपूर येथील राहणारे आहेत.
16 Sep 2024, 18:25 वाजता
मुंबईत साथीच्या आजारांचं थैमान, चिकुनगुनियाची रुग्णसंख्या 78 वर
मुंबईत साथींच्या आजारांचा धोका वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईत चिकुनगुनियाचे रुग्ण दुपटीने वाढले असून यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच चिकुनगुनियाची रुग्णसंख्या ७८ वर गेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच डेंग्यु, मलेरिया, गॅस्ट्रो आणि चिकुनगुनीयाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डासांमुळे होणा-या साथीच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी बीएमसीकडून मुंबईत `भाग मच्छर भाग´ ही मोहीम राबवली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील रुग्णसंख्या- मलेरिया 652, डेंग्यु 705, गॅस्ट्रो 326, चिकुनगुनिया 78
16 Sep 2024, 17:39 वाजता
सिडकोच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आता शक्य नसल्याने संजय शिरसाट याना अखेर सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते, तसंच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवेळी शिरसाट यांचे नाव सतत चर्चेत असायचे मात्र आता मंत्रिपद देणं शक्य नसल्याने सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
16 Sep 2024, 17:36 वाजता
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून तेल गळती
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून आज सोमवारी तेल गळती झाली. पिरवाडी समुद्र किनारी खोल समुद्रातून ONGC प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाईप लाईन मधून गळती झाली आहे. लिकेज काढण्यात ONGC कर्मचाऱ्यांना यश आले असून तात्काळ नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या पाईप लाईन दुरुस्थिचे काम सुरु असून संपूर्ण इन्स्पेकशन नंतरच तेल पुन्हा पाईप लाईन द्वारे ONGC प्रकल्पस्थळी सोडण्यात येणार.
16 Sep 2024, 17:33 वाजता
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून तेल गळती
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून आज सोमवारी तेल गळती झाली. पिरवाडी समुद्र किनारी खोल समुद्रातून ONGC प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाईप लाईन मधून गळती झाली आहे. लिकेज काढण्यात ONGC कर्मचाऱ्यांना यश आले असून तात्काळ नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या पाईप लाईन दुरुस्थिचे काम सुरु असून संपूर्ण इन्स्पेकशन नंतरच तेल पुन्हा पाईप लाईन द्वारे ONGC प्रकल्पस्थळी सोडण्यात येणार.
16 Sep 2024, 16:19 वाजता
अरविंद केजरीवाल उद्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर रविवारी आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी केजरीवाल यांनी आपण पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असे म्हटले. यानुसार केजरीवालांनी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे वेळ मागितला मागितला असून उद्या केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
16 Sep 2024, 13:59 वाजता
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत आज पासून सुरू होणार
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सोमवार 16 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या पहिल्या वंदे भारतला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा कंदील दाखवणार असून याला नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
16 Sep 2024, 13:51 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनाला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेसळी गणरायाचरणी नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांनी बाप्पाचा आशीर्वाद घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह तिथं असणाऱ्या गणेशभक्तांचं अभिवादनही स्वीकारलं.
16 Sep 2024, 13:05 वाजता
Mharashtra Breaking News LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, झाल्यानं प्रवाशांटे हाल. कळवा- मुंब्रा रेल्वे स्थानक मध्ये ओव्हर हेड वायरचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या जलद वाहतूक ठप्प. प्लॅटफॉर्म 5 व 6 वरील जलद गाड्यांची वाहतूक थांबली.