Breaking News LIVE: लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान

Maharashtra Breaking News LIVE: सार्वजनिक गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी सारे सज्ज. राज्यात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष?   

Breaking News LIVE: लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

16 Sep 2024, 12:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: जळगाव - भाजपला मोठा धक्का?

आगामी विधानसभेच्या धर्तीवर आता घडामोडींना वेग आला असून, जामनेरचे भाजप नेते दिलीप खोडपे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. जामनेरमधून गिरीष महाजन यांच्याविरोधात लढण्याची चर्चा आहे. 

 

16 Sep 2024, 11:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शरद पवारांनी मागितली मुख्यमंत्र्यांची वेळ 

ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी मागितली मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ. स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्यासाठी वेळ हवी अशी मागणी त्यांनी केली असून X च्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. 

16 Sep 2024, 10:12 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: खेड आळंदीत मोहिते पाटलांना विरोध करत महायुतीत जुंपली

दिलीप मोहितेपाटील दिलेला शब्द पाळणारा आमदार. कारण दिलीप मोहितेपाटील पुन्हा उभं रहाणार नाही त्यांना त्यांचा पराभव दिसतो त्यामुळे अजित पवारांनी दिलेले मंत्रीपदाचे आश्वासन म्हणजे गाजर दाखवलंय जात असं म्हणत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी मोहितेपाटीलांवर निशाना साधलाय 2019 च्या निवडणुकीत मोहितेपाटीलांनी जनतेला पुन्हा उभं रहाणार नसल्याचे दिले होते आश्वासन यावरुन शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी मोहितेपाटलांना तिकिटच मिळणार नसल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. 

16 Sep 2024, 08:54 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वर्ध्याच्या सामन्य रुग्णालयात बनावट औषध पुरवठा प्रकरण 

सामान्य रुग्णालयातून अन्न व औषध प्रशासनाकडून बनवट औषधांचा साठा पुन्हा एकदा जप्त केलाय. काही महिन्यांपूर्वी येथेच आठ हजार टॅबलेट बनावट असल्याचे उघड झाले होते. आता पुन्हा एफडीए ने केलेल्या कारवाईत सहा लाख तीस हजार बनावट टॅबलेटचा पुरवठा झाल्याची बाब समोर आली आहे. बनावट टॅबलेट चा पुरवठा करणाऱ्या चार एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ठाणे येथील काबीज जेनेरिक हाऊस,भिवंडी येथील अक्वेटिस बायोटेक, तर सुरत आणि दिंडोली येथील पुरवठादार फर्मासिक्स बायोटेक वर वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट औषध पुरवठा करणारे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

16 Sep 2024, 08:18 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लालबागच्या राजाची दर्शन रांग बंद 

लालबागच्या राजाच्या  विसर्जनाच्या पूर्व तयारीसाठी लालबागच्या राजाची चरण स्पर्शची रांग सोमवारी पहाटे 6 वाजता बंद करण्यात आली आहे. तसेच मुखदर्शनाची रांग रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे. उद्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आज रोजच्या तुलनेत लालबागच्या परिसरात भाविकांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे.  

16 Sep 2024, 08:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवादरम्यान पुणेकरांनी रचला नवा विक्रम 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणेमेट्रोने प्रवाशांचा नवा विक्रम केला आहे. शनिवारी एका दिवसात तब्बल 2 लाख 78 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. पुणे मेट्रोच्या इतिहासात हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. गणेशोत्सवाला लाखो भाविक पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध देखावे बघण्यासाठी येतायत. यंदाच्या वर्षी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू आहे. शनिवारी सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 2 लाख 78 हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला.

16 Sep 2024, 08:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: 25 सप्टेंबरला राज्यातील शाळा बंद

शिक्षक संचमान्यतेचा 15 मार्च 2024 चा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

16 Sep 2024, 07:51 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कर्जतमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला दिला धक्का 

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसलाय. 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका प्राची डेरवणकर, शहर समन्वयक संजय मोहिते सुदेश देवधरे मनोज जाधव अशा प्रमुख नेत्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नेतृत्व मान्य करीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हादरा बसलाय.

16 Sep 2024, 07:47 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राज्‍यातील 2 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्‍य अंधारात?

राज्‍यात सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. याला राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. ही अंमलबजावणी सुरू झाल्‍यास राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्‍य अंधारात जाण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. शासनाने हे दोन्‍ही निर्णय रदद करावेत यासाठी राज्‍यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. येत्‍या 25 सप्‍टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामुहिक रजा आंदोलन करीत प्रत्‍येक जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात येणार आहे. 

16 Sep 2024, 07:44 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे आज रात्री 12 वाजेपासून आमरण उपोषण सुरु करणार

मनोज जरांगे पाटील आज रात्री 12 वाजेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु करणार आहेत.गेल्या वर्षभरात जरांगे यांनी 5 उपोषणं केली असून आजचं त्यांचं हे 6 वं उपोषण असेल.हैद्राबाद, सातारा संस्थान आणि बॉंबे संस्थानसह सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी जरांगे यांनी केली आहे.दरम्यान ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्यासह अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा दिलाय. 57 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी आम्ही उपोषण करणार असून जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हीही उपोषण सुरू करु असा ईशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिला.