Breaking News LIVE: लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान

Maharashtra Breaking News LIVE: सार्वजनिक गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी सारे सज्ज. राज्यात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष?   

Breaking News LIVE: लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

16 Sep 2024, 07:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज 

गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे...मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

कसा असणार पोलीस बंदोबस्त

अतिरिक्त पोलीस आयुक्त : 4

पोलीस उपायुक्त : 10

सहायक पोलीस आयुक्त : 25

पोलीस निरीक्षक : 135

पोलीस कर्मचारी : पाच हजार 709

राज्य राखीव पोलीस दल : एक तुकडी

गृहरक्षक दलाचे जवान : 394

16 Sep 2024, 07:15 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कोल्हापुरात 9 वर्षांच्या चिमुकलीवर 73 वर्षांच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार 

खाजगी क्लास मध्ये शिकत असणाऱ्या नववर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खाजगी क्लास मध्ये 73 वर्षीय श्रीपती भोसले या इसमाने क्लासमध्ये बोलावून संबंधित बालिकेवर अत्याचार केल्याचा गुन्हा राधानगरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी श्रीपती भोसले याला अटक केली आहे.

16 Sep 2024, 07:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

16 Sep 2024, 06:53 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी लालबाग राजाचं दर्शन घेतलं. सकाळी सकाळीच अजित पवार लालबाग राजाच्या दर्शनाला आले. 

 

16 Sep 2024, 06:48 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: हे तर गळती सरकार; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर घणाघात 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्य तसंच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत, त्यांनी वा-याने पुतळा कोसळतो, लोकसभा गळते, राममंदिरही गळतंय, हे गळती सरकार असल्याची टीका त्यांनी केली. 

16 Sep 2024, 06:47 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुन्हा मराठ्यांचा एल्गार 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा ऐल्गार. अंतरवाली सराटीतून आजपासून आमरण उपोषण करणार आहेत.