Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
2 Sep 2024, 18:35 वाजता
नाशिकमध्ये महायुतीत उमेदवारांची रस्सीखेच
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीत उमेदवारांची रस्सीखेच पाहायला मिळतेय.. नाशिक मध्य विधानसभेवर अजित पवार गटानं दावा ठोकलाय.. सध्या महायुतीत नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहे.. या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा ठोकल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.. राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी मतदारसंघातील पदाधिका-यांची मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती.
2 Sep 2024, 17:58 वाजता
बारामतीतून जय पवारांना उमेदवारी?
अजित पवारांतर्फे बारामतीत जोरदार शक्तिप्रर्शन करण्यात आलं.. भव्य रॅली काढून अजित पवारांनी शक्तिप्रदर्शन केलं.. बारामतीत अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा झाली.. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत जय पवार सहभागी झाले.. झी 24 तासशी बोलतांना जय पवार यांनी मोठं विधान केलंय. बारामतीतून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. पण अजित पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया जय पवारांनी दिलीय.
2 Sep 2024, 17:41 वाजता
वाढवणं बंदरात पर्यटनाला देणार चालना- अजित पवार
जगातील दहा पैकी एक वाढवणं बंदर होत आहे. देशातील जगात आपला माल विकण्यासाठी या बंदराचा मोठा फायदा होणार आहे.यास 76 हजार कोटी खर्च करुन तो तयार केला जात आहे. फलटण शहरात रिंग रोड असेल फलटण पंढरपूर रेल्वे ब्रॉड गेज तयार केला जातोय. पर्यटनाला चालना देण्यासाठी या भागात विकास करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
2 Sep 2024, 16:15 वाजता
येत्या काळात आणखी महापुरुषांचे पुतळे पडतील- आमदार संजय शिरसाठ
2 Sep 2024, 13:32 वाजता
अजित पवारांचे भावी सीएम बॅनर
अजित पवारांच्या बॅनरची राज्यभरात चर्चा होत आहे. बारामतीत अजित पवारांचे शक्तीप्रदर्शन. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर बारामतीत झळकत आहेत.
2 Sep 2024, 13:21 वाजता
हार्बर मार्गावरील डाऊन लोकल सेवा विस्कळीत
बेलापूर स्थानकाजवळ ओव्हर हेडवायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळित
2 Sep 2024, 11:28 वाजता
पुण्यात माजी नगरसेवक वरदान आंदेकर यांची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
2 Sep 2024, 11:25 वाजता
पुण्यात गेल्या 12 तासांत दोन हत्या
2 Sep 2024, 10:59 वाजता
परभणीत पावसाचा धुमाकूळ सुरु झाला आहे. पावसाच्या पाण्यात बस वाहून गेली आणि पुढे जाऊन अडकली.
2 Sep 2024, 10:45 वाजता
आंध्र, तेलंगणातील पावसामुळे 100 रेल्वे रद्द
दक्षिण भारतात पडत असलेल्या सततच्या पावसाचा फटका रेल्वे प्रवासाला बसला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात झालेल्या जोरदार पावसामुळं 100 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आजही हवामान खात्याकडून अलर्ट दिला गेला असल्यान प्रशासन सज्ज झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून सर्व मदत करणार असल्याची ग्वाही दिली आहे.