Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
2 Sep 2024, 07:21 वाजता
पुण्यात बारा तासात दुसरा खून
पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनँस मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून कुलकर्णी यांची हत्या केली.
नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत का कुणाचं कारण अद्यापि स्पष्ट झालं नाही.
2 Sep 2024, 07:12 वाजता
अजित पवार आज फलटणमध्ये, संध्याकाळी 4 वाजता बैठक
फलटण येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
फलटण येथील अनंतराज मंगल कार्यालयात संध्याकाळी 4 वाजता ही बैठक आयोजित केली आहे या कार्यक्रमासाठी फलटण आणि बारामतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
या बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला जाणार आहे.
2 Sep 2024, 06:58 वाजता
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस
राज्यात काही ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी प्रसिद्ध केला. या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्याचा जोर साधारण 4 सप्टेंबरपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2 Sep 2024, 06:41 वाजता
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या
वनराज आंदेकर यांच्यावर 5 राउंड फायर करून कोयत्याने वारही करण्यात आले. उपचारादरम्यान वनराज यांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून हत्या करण्यात आलीय आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी फारार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
2 Sep 2024, 06:38 वाजता
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असून ते वारणानगर इथल्या महिला सन्मान मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रपती करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत.