Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज सहावा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
21 Dec 2024, 09:19 वाजता
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाची समिती स्थापन
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाची समिती स्थापन करण्यात आली आहे. बोट दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाने स्थापन करण्यात आली आहे. नौदलाच्या स्पीडबोटीनं धडक दिल्यानं एलिफंटाकडं जाणारी नीलकमल बोट समुद्रात बुडाली होती. तसेच या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नौदलाची समिती स्थापन करण्यात आली आहे.
21 Dec 2024, 09:17 वाजता
मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या मंत्री आणि नेत्यांना चहापानाचं आमंत्रण
मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या मंत्री आणि नेत्यांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. अजित पवार रामगिरी बंगल्यावर दाखल झाले असून चहापानानंतर उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलाय. त्यांनी आमदार आणि मंत्र्यांना आमंत्रणही दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल झालेत. दोघेही विजयगड बंगल्यावरून एकाच कारमधून फडणवीसांच्या बंगल्यावर पोहोचले. तसेच मंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकात पाटील, आमदार मिहीर कोटेचा, आमदार मुरजी पटेल रामगिरी बंगल्यावर दाखल झालेत. या चहापानाचा कार्यक्रम आणखी मंत्री, आमदार पोहोचत आहेत.
21 Dec 2024, 08:12 वाजता
योग्य वेळी योग्य खातेवाटप होईल असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. ती वेळ समीप आली आहे, आम्ही शपथ घेतलेल्या मंत्र्यांसमोर देखील खाते लागतील असंही ते यावेळी म्हणाले आहे.
21 Dec 2024, 08:08 वाजता
3 दिवसांपासून 40 हजार क्विंटल कांदा पडून
सोलापुरात 3 दिवसांपासन तब्बल 40 हजार क्विंटल कांदा पडून आहे. आज आणि उद्या कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. अमित शाहांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे माथाडी कामगारांनी कांदा उचलण्यास विरोध केला होता. त्यामुळे आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही आहे. उद्या बाजार समितीला साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे शुक्रवारपासून कांदा बाजार समितीमध्ये पडून आहे. यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.
21 Dec 2024, 08:07 वाजता
संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड... सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
21 Dec 2024, 08:04 वाजता
संजय राऊतांच्या घराची रेकी
संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्या भांडुप पूर्वेकडील घराची शुक्रवारी सकाळी दोन अनोळखी तरुणांनी रेकी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांच्या तपासात रेकी नाही तर ते तरुण मोबाईल नेटवर्कचे टेस्ट ड्रायव्ह करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. याबाबत मुंबई पोलिसांकडून प्रसिध्दी पत्रक जाहीर केलं आहे. घराचे रेकी करणारे कोणी गुंड नसून ते एका खासगी कंपनीचे कर्मचारी होते सेलप्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे ते चार कर्मचारी होते.. ईरिक्सन कंपनीकडून मोबाईल नेटवर्कचं टेस्ट ड्रायव्ह करत असल्याचे पोलीस चौकशी दरम्यान निष्पन्न झालंय.. पोलिसांनी तशी संबधीत कंपनीकडून खात्री सुद्धा केली आहे.
21 Dec 2024, 08:02 वाजता
धारावीचा पुनर्विकास?
मुंबईतील धारावी पुनर्विकास निविदेविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. कंत्राट देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी नाही, अशा शब्दांत हायकोर्टानं याचिकाकर्त्याला सुनावलं आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला सेकलिंक टॅक्नॉलॉजी या कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. एका ठराविक खासगी कंपनीलाच निविदा मिळावी, अशा पद्धतीने निविदेमध्ये अटी आणि शर्ती होत्या. तीन जणांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ अदानी समुहालाच निविदा मिळाली, असे सेकलिंकनं म्हटलं होतं. याचिकाकर्त्यांचा हा आरोप न्यायालयानं फेटाळून लावला.
21 Dec 2024, 08:00 वाजता
शरद पवार संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट
शरद पवार आज बीड, परभणी दौ-यावर आहेत. मस्साजोगमध्ये जाऊन मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत. परभणी हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. तर विजय वाकोडे यांचंही निधन झालं होतं. त्यांच्याही कुटुंबीयांची पवार घेणारेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
21 Dec 2024, 07:59 वाजता
अधिवेशनाचा शेवटचा दिवस
महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजेल. अंतिम आठवडा प्रस्तावावर कालची चर्चा आजही सुरू राहिल आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने त्यावर उत्तर दिले जाईल. नेहमीप्रमाणे सायंकाळी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होवून अधिवेशनाची सांगता होईल.