Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

Maharashtra Breaking News LIVE: राजकीय घडामोडी, दैनंदिन अपेड्टससहीत महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावा आढावा आणि संक्षिप्त स्वरुपातील अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

18 Aug 2024, 12:09 वाजता

जोपर्यंत क्रूर शक्ती आम्ही गाडत नाही तोपर्यंत...; नागपूरमधून राऊतांचा एल्गार

नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचून पत्रकारांशी संवाद साधला. विदर्भात 50 ते 55 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.  20-21 तारखेला जागांबाबत बैठक होईल, असंही त्यांनी सांगितलं. जोपर्यंत क्रूर शक्ती आम्ही गाडत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, असं राऊत म्हणाले. प्रत्येकावर ठरवून अत्याचार झाले हे ते आणीबाणी पेक्षा वाईट होते 

18 Aug 2024, 12:05 वाजता

मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यात 50 हजार 'लाडक्या बहिणींच्या' उपस्थिती लाभार्थ्यांसाठी कार्यक्रम

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा कार्यक्रम थोड्याच वेळात साता-यातील सैनिक स्कुल मैदानावर सुरु होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित असणार आहेत. जवळ जवळ 50 हजार महिला उपस्थित राहतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

18 Aug 2024, 11:07 वाजता

'अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांबद्दल देवेंद्र फडणवीसांनी करावा खुलासा'

'जन सन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजींनी तात्काळ खुलासा करावा,' असं ट्वीट अजित पवार गटाचे विधान परिषदेचे खासदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

18 Aug 2024, 10:04 वाजता

पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज जालन्यात

शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे येत आहे. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते संध्याकाळी 5 वाजता भोकरदनमध्ये सभा घेणार आहेत.

18 Aug 2024, 09:21 वाजता

दाभोलकर खटला : सीबीआयला दाभोलकर कुटुंबीयांची विनंती

पुणे सत्र न्यायालय 10 मे रोजी लागला होता. पुराव्या अभावी तिघांची दोषमुक्त करण्यात आलं होतं. शंभर दिवस उलटून गेले तरीही सीबीआयने आरोपीच्या निर्दोष विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले नाही. सुटकेच्या विरोधात दाभोळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केला आहे. सीबीआयकडून मात्र अजून उच्च न्यायालयात अपील दाखल न केल्याने दाभोलकर कुटुंबाकडून विनंती करण्यात आली आहे. हायकोर्टात तात्काळ अपील करा अशी विनंती दाभोलकर कुटुंबीयांनी सीबीआयला निवेदनाद्वारे केली आहे.

18 Aug 2024, 09:18 वाजता

राज्यात पावसाचा इशारा...

पावसाने दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्याने घाम निघत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (तारीख 18 ऑगस्ट 2024 रोजी) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

18 Aug 2024, 08:24 वाजता

भोकरमध्ये हाकेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळावा

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत भोकरमध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 च्या सुमारास भोकर या तालुक्याच्या शहरातून ओबीसी रॅली निघणार आहे. त्यांनतर सकाळी 11 वाजता ओबीसी मेळावा होणार आहे.

18 Aug 2024, 08:21 वाजता

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक कसा असेल?

कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

18 Aug 2024, 08:20 वाजता

हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक कसा?

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

18 Aug 2024, 08:19 वाजता

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी कामे, रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक कसा असेल ते पाहूयात...

ठाणे – दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर आज ब्लॉक असेल

कधी : रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत

परिणाम : सकाळी 9.46 सीएसएमटी – बदलापूर, सकाळी 10.28 सीएसएमटी – अंबरनाथ, दुपारी 2.42 सीएसएमटी – आसनगाव, दुपारी 3.17 कल्याण – सीएसएमटी दरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी 9.50 वाजताची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी 11.45 वाजताची दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. दुपारी 12.55 वाजता वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी .245 वाजता दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.