18 Aug 2024, 07:06 वाजता
'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'
"भारताने आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. बहुमत गमावलेले आपले पंतप्रधान श्रीमान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या," असं म्हणत टीका करण्यात आली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त.
18 Aug 2024, 07:03 वाजता
नितेश राणेंचा आज इंदापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा
भाजपाचे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत इंदापूरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन. राणेंची आज दुपारी 12 वाजता इंदापूर नगरपरिषद मैदानात सभा. मात्र आमदार नितेश राणेंना इंदापुरात येण्यास काही राजकीय नेत्यांसह सकल मराठा युवकांचा तीव्र विरोध आहे.
18 Aug 2024, 06:34 वाजता
जुन्नरमध्ये आज अजित पवारांची सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जुन्नरमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठका आहेत. आंबेगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा दुपारी 1 वाजता होणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यातील निलायम गार्डन मंगल कार्यालयात हॉस्पिटॅलिटी व पर्यटन संदर्भात विविध बैठका होणार असून सकाळी 8.30 वाजल्यापासून बैठकींना सुरुवात होणार आहे.
18 Aug 2024, 06:34 वाजता
असा आहे अजित पवारांचा आजचा दौरा
सकाळी साडेदहा वाजता जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बस स्थानक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत केलं जाईल त्यानंतर 14 नंबर येथे बेनके फार्म हाऊसमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम सकाळी आकरा वाजता पार पडणार आहे. शिरूर - हवेली विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे.
18 Aug 2024, 06:28 वाजता
परळच्या महाराजाचे आगमन
गणेशोत्सवाला अजून 20 दिवस बाकी असले तरी मुंबईत आतापासूनच मोठमोठ्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा होत आहे. शनिवारी परळ येथील महाराजा गणपतीचा आगमन सोहळा थाटात पार पडला. ढोल-ताशा, डीजेच्या गजरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा आगमन सोहळा पार पडला. गणेशाची शुभकाशी ही मूर्ती असून नरकासुराच्या वध करत असलेली गणेशाची आणि शंकराची भव्य मूर्ती आहे. आतापासून गणेशाची मूर्ती मंडपात नेल्यानंतर पुढे सजावट करावी लागते त्यामुळे 15 ते 20 दिवस आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आपल्या गणेश मूर्ती घेऊन जातात.
18 Aug 2024, 06:26 वाजता
बांगलादेशमधील हिंदूंना हवी ती मदत करण्यासाठी भारत सरकार तत्पर
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घटनाक्रमावरून, त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंना मदत दिलीच पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. भारत सरकार त्या दृष्टीने सर्व काही पावलं उचलत असल्याचची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी परभणीत दिली. मंत्री श्रीपाद नाईक हे परभणी येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिले. बांगलादेश मधील हिंदूंना लागेल ती मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी काम करत असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
18 Aug 2024, 06:23 वाजता
अजित पवारांच्या बैठकीवर शिंदे गटाचा बहिष्कार; कारण ठरली 'लाडकी बहीण'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज होणाऱ्या आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या 'जन सन्मान' यात्रेत ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' या योजनेचे नाव बदलून '''माझी लाडकी बहीण''' असं नामकरण करून प्रचार व प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात येत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्यात महायुती असतानाही आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्याने शिवसैनिकांनी नाराज होऊन आजच्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.