Maharashtra Breaking News LIVE: राज्यात आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. तर एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
12 Aug 2024, 07:43 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: 'अर्जुन खोतकरांनी विधानसभेत निवडून जावं आणि माझ्या जागेवर मंत्री बनावं'
टायगर अभी जिंदा है,असं म्हणत अर्जुन खोतकर यांनीं विधानसभेत निवडून जावं आणि माझ्या जागेवर मंत्री बनावं त्यांच्यासाठी मदत करायला मी तयार आहे, असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
12 Aug 2024, 07:41 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत
यंदाच्या खरीप हंगाम मध्ये जिल्ह्यात एकूण 4लाख 5 हजार 180 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून त्यामध्ये 3 लाख 7 हजार 275 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. जवळपास 75 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.सोयाबीन पीक चांगलं बहरले होती.मात्र मागील 15 दिवसापासून सततचा पाऊस व ढगाळ वातावरण होते. या बदलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर अळीसह इतर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
12 Aug 2024, 07:40 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे पाटील यांची नगर शहरात शांतता रॅली
मनोज जरांगे पाटील यांची नगर शहरात शांतता रॅली निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिवादन त्यानंतर मिरवणुक मार्गाने रॅली निघून 4 वाजता चौपाटी करंजा येथे सभा होईल
12 Aug 2024, 07:35 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: सुधारित पेन्शन; कर्मचारी, शिक्षक पुन्हा संपावर
राज्य सरकारने 'सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना' जाहीर केली, मात्र आठ महिने उलटूनही शासन निर्णय जारी केला नसल्याने २९ ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिला आहे.
12 Aug 2024, 06:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पटियाला हाऊस न्यायालयानं १ ऑगस्टला पूजा खेडकर यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.